Marathi News
‘मनाचे श्लोक’ टीमने बजावला मतदानाचा हक्क
नुकतेच चित्रीकरण सुरु झालेल्या ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या टीमपैकी पुण्यातील सुजाण नागरिकांनी आज व्यस्त वेळापत्रकातून वेळातवेळ काढून आपला मतदानाचा हक्क बजावला. यात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, निर्माता श्रेयश जाधव, संजय दावरा आदींचा समावेश होता. मतदान झाल्यावर या टीमने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली.
गणराज असोसिएट्स आणि संजय दावरा फिल्म्स निर्मित, मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपटाच्या माध्यमातून मृण्मयी आणि राहुल पेठे पुन्हा एकदा एकत्र झळकणार असून चित्रपटाच्या निर्मितीची धुरा श्रेयश जाधव आणि संजय दावरा यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे डीओपी अभिजित अब्दे आहेत. ‘मनाचे श्लोक’ या सिनेमाचे चित्रीकरण पुण्यात सुरु झाले आहे. आज या चित्रपटातील कलाकारांनी मतदान करून इतर नागरिकांनाही आवर्जून आपला हा अधिकार बजावण्याचे आवाहन केले.