Marathi News

Hruditya Something Something : हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा रिफ्रेशिंग टिझर !

हृदयात समथिंग समथिंग

प्रविण राजा कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा टिझर नुकताच युट्यूबवर लाँच झाला आहे. अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हृदयात समथिंग समथिंग सिनेमाच्या रिफ्रेशिंग टिझरला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ह्याविषयी सिनेमाचे दिग्दर्शक प्रविण राजा कारळे म्हणतात, “प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तिला इम्प्रेस करताना प्रेमवीरांची कधी-कधी त्रेधातिरपिट उडते. ह्या त्रेधातिरपिटीमधल्याच गंमतीजंमती हृदयात समथिंग समथिंग ह्या सिनेमात तुम्हांला पाहायला मिळतील.”

अभिनेते अशोक सराफ म्हणतात, “आयुष्यात कधीही प्रेमात न पडलेला माणूसच विरळा. त्यामूळे प्रत्येकाला प्रेमात पडल्यानंतर ह्या सिनेमात होणा-या गंमती-जंमती कधीतरी आपल्याही बाबतीत घडल्यात असे वाटेल. ही तुमच्या-आमच्या सर्वांच्या ‘हृदया’जवळची कथा आहे.”

अभिनेता अनिकेत विश्वासराव सांगतो, “अशोकमामांनी आपल्या सर्वांच्या हृदयात गेली कित्येक वर्ष राज्य केले आहे. आणि आता ह्या मॅड-कॉमेडी सिनेमातून पून्हा एकदा त्यांचं धमाल कॉमिक टाइमिंग आपल्याला अनुभवता येईल. हा कौटूंबिक मनोरंजक सिनेमा तुम्हांला पोटभर हसवेल, असा मला विश्वास वाटतो.”

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button