Marathi Newsnewshunt

सतत बातम्यांमध्ये राहिलेली डेजी शाह, स्कोर ट्रेंड्स इंडियावर बनली नंबर वन !

 

गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या रेस-3 चित्रपटामूळे बॉलीवूड अभिनेत्री डेझी शाह चर्चेत राहिली. रेस-3 मधला ‘अवर बिजनेस इज अवर बिजनेस… नन ऑफ युवर बिजनेस’ हा संवाद खूप लोकप्रिय झाला. सलमानच्या डायलॉग्सपेक्षा डेजीच्या तोंडी असलेल्या ह्या संवादाला चाहत्यांची पसंती मिळाली.

रेस-3 आणि दंबंग टूरमूळे गेल्या काही दिवसांमध्ये वृत्तपत्रांमध्ये भरपूर कव्हरेज मिळालेली डेझी शाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लिडरबोर्डर पांचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. मे महिन्यामध्ये 16व्या स्थानी असलेली डेझी दिवसें दिवस लोकप्रियतेची एक एक पायरी चढत आहे. आणि आता तिला पहिल्या पांच लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीतही स्थान मिळाले आहे.

न्यूजमध्ये सतत राहिल्यामूळे डेझी ‘न्यूज प्रिंट’मध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. स्कोर ट्रेड्सच्या चार्टवर 72 गुणांसह डेझी शाह ‘न्यूज प्रिंट’मधली नंबर वन अभिनेत्री आहे. तर तिची रेस-3मधली कोस्टार आणि दबंग टूरमधली सहकारी जॅकलीन फर्नांडिस 57 गुणांसह दूस-या स्थानी आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “देशभरातल्या मीडियाने गेल्या एका महिन्यात डेजीच्याविषयी छापलेल्या न्यूज कव्हरेजमूळे ‘न्यूज प्रींट’ मीडियामधली ती सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे सोशल मीडियामध्येही डेझीची वेगाने प्रसिध्दी होताना दिसतेय. स्कोर ट्रेंड्स लीडरबोर्डमध्येही डेजी 16 व्या स्थानावरून 5 व्या स्थानी पोहोचली आहे.“

अश्वनी कौल पूढे म्हणतात, ” 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button