Marathi News

हृदयात समथिंग समथिंगचे फस्ट लुक पोस्टर झाले रिलीज

HSS TEASER POSTER_DATE

 

प्रेमात पडल्यावर सतत त्या व्यक्तिला भेटण्याची हूरहूर मनाला लागते. आपल्याला ज्या व्यक्तिबद्दल खास ‘फिलींग्स’ आहेत, ती व्यक्ति फक्त आपलीच व्हावी, ह्यासाठी नानाविध गोष्टी प्रेमवीर करत असतात. आणि त्या प्रेमातल्या ‘केमिकल लोच्या’मूळे मग ब-याच गंमतीजमतीही आयुष्यात घडतात. ह्यावरच ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट आधारित आहे.

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाची विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांनी निर्मिती केली आहे. तर सचिन नथुराम संत ह्यांची सहनिर्मिती असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे ह्यांनी केले आहे.

नुकताच ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाचा फस्ट लुक सोशल मीडियावरून लाँच झाला. फस्ट लुक पोस्टर लाँच झाल्यावर चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणाले, “ प्रेमात पडल्यावर प्रत्येकाच्याच ‘हृदयात समथिंग समथिंग’ होतं. आयुष्यात एकदा तरी ह्या फिलींगची अनुभूती प्रत्येकानेच घेतलेली असते. तुम्ही प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तिला इम्प्रेस करता-करता काही विनोदी घटना तुमच्या आयुष्यात घडल्या तर काय धमाल येते, ह्यावर हा चित्रपट आहे.

दिग्दर्शक प्रविण राजा कारळे सिनेमाविषयी सांगतात, “ हा धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपट आहे. अनिल कालेलकर ह्यांनी लिहीलेल्या संवादांमूळे तुम्ही चित्रपटभर सतत हसत राहाल, ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. ब-याच कालावधीत मराठी फिल्म इंडस्ट्रीत असा विषय सिनेरसिकांच्या समोर आला नाही. चित्रपट प्रेमाविषयी असला तरीही कुटूंबातल्या 90 वर्षांच्या आजीपासून ते 9 वर्षांच्या मुलांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखा आहे.”

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button