Marathi News

सोनू, श्रेया आणि अमितराज ‘देवा’ मधून प्रथमच एकत्र

Deva Marathi Movie
Deva Marathi Movie

 

‘देवा’ या बहुचर्चित सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर ‘रोज रोज नव्याने’ हे गाणे लॉच झाले.
इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित या सिनेमाच्या टीझरने वाढवलेली प्रेक्षकांची उत्सुकता आता या गाण्यामुळे शिगेला पोहोचली आहे. मुरली नलप्पा दिग्दर्शित ‘देवा’ सिनेमातील या रॉमेंटीक गाण्याला सोनु निगम आणि श्रेया घोषाल या हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज लाभला आहे. प्रेमाच्या श्रवणीय जगात घेऊन जाणारे हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून संगीतदिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला चाल दिली आहे. विशेष म्हणजे, ‘रोज रोज नव्याने’ या गाण्यांमार्फत सोनू, श्रेया आणि अमितराज ही संगीतविश्वातील जोडी प्रथमच ‘देवा’ या सिनेमातून एकत्र आली आहे.
प्रेमीयुगुलांना पर्वणी ठरत असलेले हे गाणे, श्रेयालादेखील पसंत असून, हे गाणे माझे फेव्हरेट साँग असल्याचे ती सांगते. येत्या १ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात अंकुश -तेजस्विनीबरोबरच डॉ. मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार हे कलाकारदेखील आपणास पाहायला मिळणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button