सावनी रविंद्रचे अभिनयात पदार्पण !
आपल्या सुमधूर गीतांनी कानसेनांना मोहित करणारी गायिका सावनी रविंद्रने आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘टायनी टॉकीज’ ह्या युट्यूब चॅनलच्या ‘गालिमार’ ह्या वेबसीरिज मध्ये तिने नुकतीच एक्टिंग केली आहे.
आपल्या ह्या पदार्पणाविषयी ती म्हणाली, “ह्या वेबसीरिजची निर्माती आदिती द्रविड माझी जूनी मेत्रिण आहे. तिने जेव्हा वेबसीरिजसाठी विचारले तेव्हा पहिल्यांदा मला गाण्यासाठी विचारले असल्याचे वाटले. पण नंतर तिने अभिनयासाठी विचारणा केल्याचा उलगडा झाला. खरं तर मला अशा ऑफर ब-याचदा आल्या होत्या. पण मला अभिनय क्षेत्रापेक्षा गायनातच करीयर करायचे असल्याने नेहमीच अशा ऑफर्सना नाकारत गेले. पण आदितीशी असलेल्या घनिष्ठ मैत्रीमूळे तिला नाही म्हणता आले नाही.”
सावनीने ह्या वेबसीरिजमध्ये सुयश टिळकसोबत अभिनय केला आहे. त्याविषयी ती सांगते, “सुयश माझा क़ॉलेजमधला मित्र. त्यामूळे खरं तर माझी एक्टिंग करताना भीड चेपली गेली. मी हा अभिनय करण्याचा पहिला-वहिला अनूभव जास्त एन्जॉय करू शकले.”
https://www.youtube.com/watch?v=PSIK8NnOG2E&feature=youtu.be