सलमान खान आणि प्रियंका चोप्रा ठरले बॉलीवूडचे ‘ट्रेंडसेटर’ !

गेल्या वर्षभरात सुपरस्टार सलमान खान आणि प्रियंका चोप्राच सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड सेलेब्स होते. असं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने काढलेल्या वार्षिक चार्टनूसार, असं समोर आलंय की, सलमान आणि प्रियंका दोघंही सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 मध्ये ट्रेंडसेटर ठरलेत.
स्कोर ट्रेंड रिपोर्टच्यानूसार, सर्व सोशल प्लॅटफार्मवर (ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, न्यूज़प्रिंट, डिजिटल न्यूज, आणि व्हायरल न्यूज) 52 आठवड्यांपैकी 29 आठवडे सलमान खान सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत अग्रणी स्थानावर राहिला. जे कोणत्याही सेलिब्रिटीसाठी एक मोठं यश म्हणता येईल.
प्रियंका चोप्राला दीपिका पादुकोण आणि आलिया भट्टची तगडी स्पर्धा होती. मात्र 52 आठवड्यांमधल्या 15 आठवडे लोकप्रियतेत नंबर वन स्थानी राहिल्याने वर्षभरात सर्वाधिक लोकप्रिय राहिलेली प्रियंका ट्रेंडसेटर ठरलीय.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “सलमान आणि प्रियंका दोघही ट्रेंडसेटर आहेत आणि सोशल प्लॅटफॉर्मवर 52 आठवड्यांपर्यंत आपली मजबूत पकड़ राखणे सोप्पे काम नाही.”
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. अश्वनी कौल पूढे सांगतात, 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”
Leave a Reply
You must be logged in to post a comment.