Marathi News

संस्कृती कला दर्पण गौरव रजनीची सर्वाधिक नामांकने ‘डोंट वरी बी हॅप्पी’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ला जाहीर

LOGO
 
* सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 
* अभिनेता स्वप्नील जोशीला फेस ऑफ द इयर २०१६ पुरस्कार 
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नवोदित तसेच ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करणा-या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी पुरस्काराने महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात आपली विशेष मोहर उमटवली आहे. गेली १६ वर्षे सातत्याने मनोरंजन कलाकृतींना आणि त्यातील कलावंतांना नावाजणाऱ्या या पुरस्कारांमध्ये चित्रपट, व्यावसायिक नाटक, टीव्ही मालिका आणि वृत्त वाहिनी अशा एकूण चार विभागातील नुकतीच नामांकने जाहीर झाली आहेत. नाटक विभागातील नामांकन यादीत ‘तिन्ही सांज’, ‘दोन स्पेशल’, ‘परफेक्ट मिस मॅच’, ‘ऑल दि बेस्ट २’, ‘डोंट वरी बी हॅप्पी’ आणि  ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकांचा समावेश आहे. त्यापैकी सर्वोत्कृष्ट नेपथ्य, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, लक्षवेधी अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट नाटक या विभागातील पुरस्काराकरिता चुरशीची स्पर्धा रंगली आहे. चित्रपट विभागातील पुरस्कारांवर सध्याच्या गाजत असलेल्या सिनेमांनी स्थान मिळवले आहे. त्यात ‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘नटसम्राट’ आघाडीवर आहेत, तसेच संदूक आणि मितवा या चित्रपटांनाही विशेष नामांकन देण्यात आलेले आहेत. सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन, संगीत,गीतरचना, पार्श्वगायिका, छायांकन, रंगभूषा, संकलन, संवाद, पटकथा, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता अशा एकूण ११ पुरस्कारांसाठी ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाला नामांकन प्राप्त झाली आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘नटसम्राट’ ची इतर नामांकनाबरोबरच सर्वात लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला असून, दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना अभिनय सम्राट पुरस्कार या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय यंदाच्या १६ व्या संस्कृती कलादर्पण रजनी पुरस्कार फेस ऑफ द इयर-२०१६ चा पुरस्कार अभिनेता स्वप्नील जोशीला देण्यात आला, तर अभिनेत्री मानसी नाईकला स्टाईल आयकॉन २०१६ घोषित करण्यात आले.
मालिका विभागातील पुरस्कारांमध्ये  कलर्स मराठीवरील  ‘सरस्वती’ आणि ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या कार्यक्रमांनी छाप पाडली आहे. सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कार नामांकनात एकूण ५ मालिकेंमध्ये चुरशीची लढत रंगली आहे.
नाट्य विभागातील पुरस्कारांसाठी एकूण सहा सर्वोत्कृष्ट नाटकांची निवड करण्यात आली. त्यात शेवग्याचा शेंगा, डोंट वरी बी हॅप्पी, ऑल दि बेस्ट २, परफेक्ट मिस मॅच, दोन स्पेशल आणि तिन्ही सांज या नाटकांचा समावेश होता. या स्पर्धेत एकूण २७ नाटकांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या, तसेच ६ व ७ एप्रिल दरम्यान झालेल्या चित्रपट महोत्सवात ११ सिनेमे दाखवले गेले. यंदाच्या वर्षी चित्रपट विभागात तब्बल ६४ चित्रपटांची नोंदणी झाली होती. त्यापैकी नटसम्राट, ख्वाडा, हलाल, मितवा, देऊळ बंद, संदूक, रंगा पतंगा,कोती,डबल सीट, दगडी चाळ आणि कट्यार काळजात घुसली या चित्रपटांनी पहिल्या अकरात बाजी मारली होती. चित्रपट विभागातील ज्युरीमंडळात असलेल्या श्रावणी देवधर, दीपक देऊळकर, समृद्धी पोरे, अभिजित पानसे, अमित भंडारी आणि अमृता राव यांनी निवड झालेल्या चित्रपटांचे परिक्षण केले आहे.  नाट्य परिक्षण विभागातील प्रदीप कबरे, रोहिणी निनावे आणि अविनाश खर्शीकर यांनी यंदाच्या नाट्यस्पर्धेच्या परिक्षणाची धुरा सांभाळली होती. यंदाच्या वर्षीचा मराठी चित्रपट क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अंधेरीतील कोहिनूर कॉन्टीनेन्टल पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. याप्रसंगी कलर्स मराठी वाहिनीचे हेड संजय उपाध्ये, संस्कृती कला दर्पण संस्थेच्या संचालिका स्मिता जयकर, प्रमोद पवार, मिलिंद गवळी, विजय पाटकर, सरिता मालपेकर, पंकज विष्णू,  प्रदीप कबरे उपस्थित होते.
चित्रपट विभागात प्रथम येणाऱ्या कलाकृतीला बक्षीस रोख रक्कम रुपये दीड लाख असून नाट्य विभातील विजेत्यांना एक लाख रुपये असणार आहे. तसेच दोन्ही प्रमुख विभागातील संबंधित इतर सहाय्यक विभागातील विजेत्यांना संस्कृती कला दर्पण गौरव रजनीचे सन्मान चिन्ह बहाल करण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेत निवडलेल्या चित्रपटाना आणि नाटकांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही पारितोषिके मिळाली असल्याने संस्कृती कला दर्पणच्या निवडीबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील विश्वासार्हता द्विगुणीत झाली आहे. २४ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी ७ वाजता गोरेगाव (पूर्व) येथील नॅस्को ग्राउंडमध्ये अंतिम पुरस्कार सोहळा होणार असल्याची माहिती संस्कृती कलादर्पण संस्थेचे आयोजक अर्चना नेवरेकर व चंद्रशेखर सांडवे यांनी दिली.
————————————————————————————————————————

 

१६ वा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 
नाटक विभाग नामांकन 
सर्वोत्कृष्ट नेपथ्य नामांकन
१. संदेश बेंद्रे
( तिन्ही सांज )
२. प्रदीप मुळ्ये
(दोन स्पेशल )
३. प्रदीप मुळये
(परफेक्ट मिसमॅच)
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना नामांकन 
१. राजन ताम्हाणे
( तिन्ही सांज )
२.  प्रदीप मुळ्ये
(दोन स्पेशल )
३. अमोघ फडके
(डोन्ट वरी बी हॅप्पी )
 सर्वोत्कृष्ट रंगभूषा घोषित पुरस्कार 
       विक्रम गायकवाड
            (इंदिरा)
 सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत  नामांकन 
१. अनमोल भावे
 (दोन स्पेशल )
२. राहुल रानडे
(परफेक्ट मिसमॅच)
३. नरेंद्र भिडे
(शेवग्याच्या शेंगा )
 सर्वोत्कृष्ट संगीत  नामांकन
१. परिक्षित भातखंडे
( तिन्ही सांज )
२. देवदत्त साबळे
( मी आणि ती )
३. त्यागराज खाडिलकर
( मला वेड लागले संतांचे )
सर्वोत्कृष्ट लेखक नामांकन 
१. हिमांशू स्मार्थ
(परफेक्ट मिसमॅच)
२. मिहीर राजदा
(डोन्ट वरी बी हॅप्पी )
३. गजेंद्र अहिरे
(शेवग्याच्या शेंगा )
४. क्षितिज पटवर्धन
(दोन स्पेशल )
५. शिल्पा नवलकर
( सेल्फी )
सर्वोत्कृष्ट  बालकलाकार घोषित 
  अथर्व बेडेकर
(सोबतीने चालताना )
सर्वोत्कृष्ट  सहाय्यक अभिनेत्री  नामांकन 
१. ऋतुजा देशमुख
( सेल्फी )
२. शाल्मली टोळ्ये
( तिन्ही सांज )
३. कादंबरी कदम
( शेवग्याच्या शेंगा )
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता / अभिनेत्री नामांकन 
१. मयुरेश पेम
( ऑल दी बेस्ट-२ )
२. समीर चौगुले
( श्री बाई समर्थ )
३. संदीप रेडकर
( जाऊ द्या ना भाई )
४. वनिता खरात
( श्री बाई समर्थ )
५. ऐश्वर्या पाटील
( जाऊ द्या ना भाई )
विशेष ज्युरी पुरस्कार घोषित 
१. अभिनेता – किरण माने
(परफेक्ट मिसमॅच)
२. अभिनेत्री – उषा नाडकर्णी
(लंडनच्या आजी बाई)
लक्षवेधी अभिनेत्री नामांकन 
१. निर्मिती सावंत
( श्री बाई समर्थ )
२. सुकन्या कुलकर्णी
(सेल्फी )
३. सुप्रिया विनोद
(इंदिरा )
लक्षवेधी अभिनेता नामांकन 
१. अभिजित गुरु
(तळ्यात मळ्यात )
२. संजय मोने
( शेवग्याच्या शेंगा )
३. अंगद म्हसकर
(तिन्ही सांज )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन 
१. गिरीजा ओंक
(दोन स्पेशल )
२. शीतल क्षीरसागर
( तिन्ही सांज )
३. अमृता सुभाष
( परफेक्ट मिसमॅच)
४. स्पृहा जोशी
(डोन्ट वरी बी हॅप्पी )
५. स्वाती चिटणीस
( शेवग्याच्या शेंगा )
सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकन 
१. उमेश कामत
(डोन्ट वरी बी हॅप्पी )
२. जितेंद्र जोशी
(दोन स्पेशल )
३. अरुण नलावडे
( श्री बाई समर्थ )
४. संजय मोने
( शेवग्याच्या शेंगा )
५. मिलिंद शिंदे
( अभीर गुलाल )
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नामांकन
१. गजेंद्र अहिरे
( शेवग्याच्या शेंगा )
२. अव्दैत दादरकर
(डोन्ट वरी बी हॅप्पी )
३. क्षितिज पटवर्धन
(दोन स्पेशल )
४. देवेंद्र पेम
(ऑल दी बेस्ट २)
५. मंगेश कदम
( परफेक्ट मिसमॅच)
सर्वोत्कृष्ट नाटक २०१६ नामांकन 
१. तिन्ही सांज – त्रिकुट निर्मित
२. शेवग्याच्या शेंगा – श्री चिंतामणी निर्मित
३. डोन्ट वरी बी हॅप्पी – सोनल प्रॉडक्शन
४. दोन स्पेशल – अथर्व आणि मिश्री थिएटर
५. ऑल दी बेस्ट २ – अनामय निर्मित
६. परफेक्ट मिसमॅच – सोनल प्रॉडक्शन
१६ वा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 
चित्रपट विभाग 
सर्वोकृष्ट कला दिग्दर्शक नामांकन 
१. संतोष फुटाणे – कट्यार काळजात घुसली.
२. महेश कुडाळकर – संदुक
३. मनोहर पाटील – दगडी चाळ
४. एकनाथ कदम – नटसम्राट
सर्वोकृष्ट  संकलन नामांकन
१.  क्षितिज खंडागळे – मितवा
२. सर्वेश परब – संदुक
३. मुकेश तिमारी – भो – भो
४. चारुश्री रॉय – डबलसीट
 ५. आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले-सहाय – कट्यार काळजात घुसली
सर्वोकृष्ट  छायांकन नामांकन
१. सुधीर पलसाने – कट्यार काळजात घुसली
२. प्रसाद भेंडे – मितवा
३. अजित रेड्डी – नटसम्राट
४. कृष्णाकुमार सोरेन – नीलकंठ मास्तर
५. अमरेंद्र भोसले – पन्हाळा
सर्वोकृष्ट रंगभूषा नामांकन
१. विक्रम गायकवाड – कट्यार काळजात घुसली
२. सचिन जगधर्णे, राजेंद्र शर्मा – संदुक
३. महेश बराटे – देऊळबंद
४. विनोद सरोडे – मितवा
५. विक्रम गायकवाड – नटसम्राट
सर्वोकृष्ट संगीत नामांकन
१. पं. जितेंद्र अभिषेकी, शंकर-एहसान-लॉय – कट्यार काळजात घुसली
२. अमितराज सावंत – मितवा
३. अवधूत गुप्ते – एक तारा
४. ऋषिकेश, सौरभ, जसराज – डबलसीट
५. शशांक पोवार – परतु
सर्वोकृष्ट गीतरचना नामांकन
१. सुर निरागस हो – पुरषोत्तम दारव्हेकर – कट्यार काळजात घुसली
२. सावर रे – अश्विनी शेंडे – मितवा
३. अधीर मन झाले – गजेंद्र अहिरे – नीलकंठ मास्तर
४. मन धागा धागा – क्षितिज पटवर्धन – दगडी चाळ
५. विठ्ठल विठ्ठल – गुरु ठाकूर – एक तारा
 सर्वोकृष्ट पार्श्वगायिका नामांकन
१. सावर रे – जान्हवी प्रभू – अरोरा – मितवा
२. अधीर मन झाले – श्रेया घोषाल – नीलकंठ मास्तर
३. एक सेल्फी आरपार – शाल्मली खोलगडे – हायवे
 सर्वोकृष्ट पार्श्वगायक नामांकन
१. सुर निरागस – शंकर महादेवन – कट्यार काळजात घुसली
२. सुरत पिया की – राहुल देशपांडे-महेश काळे – कट्यार काळजात घुसली
३. सखे तुझ्या नावाच – अवधूत गुप्ते – एक तारा
 सर्वोकृष्ट संवाद नामांकन
१. प्रकाश कापडिया – कट्यार काळजात घुसली
२. भाऊराव कऱ्हाडे- ख्वाडा
३. किरण यज्ञोपवीत- अभिजित देश्पांडे – नटसम्राट
४. प्रविण तरडे – देऊळबंद
सर्वोकृष्ट पटकथा नामांकन
१. अतुल काळे, आशिष रायकर, सुबोध खानोलकर- संदुक
२. प्रविण तरडे – देऊळबंद
३. भरत गायकवाड, जयंत बार्डोलोय – भो- भो
४. भाऊराव कऱ्हाडे- ख्वाडा
५. प्रकाश कापडिया – कट्यार काळजात घुसली
सर्वोकृष्ट कथा नामांकन
१. प्रविण तरडे – देऊळ बंद
२. राजन खान – हलाल
३. चिन्मय पाटणकर – रंगा पतंगा
४. स्वप्ना वाघमारे- जोशी – मितवा
सर्वोकृष्ट बालकलाकार नामांकन
१. अज्ञेश मुंडशिंगकर – कोती
२. रुपेश बने – सिंड्रेला
३. दिव्येश मेदगे – कोती
४. चैतन्य बडवे- सुरक्या
५. यश देसाई – श्यामची शाळा
६. शरयू सोनावणे – आटली बाटली फुटली
७. अनिरुद्ध चव्हाण – रोपट
सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन
१. संदीप पाठक – रंगा पतंगा
२. शशांक शेंडे – ख्वाडा
३. शंकर महादेवन – कट्यार काळजात घुसली
४. किशोर कदम – परतु
५. हेमंत ढोमे – ऑनलाईन बिनलाईन
 सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन
१. प्रार्थना बेहेरे – मितवा
२. रेणुका शहाणे – हायवे
३. भार्गवी चिरमुले – संदुक
४. मृण्मयी देशपांडे – कट्यार काळजात घुसली
५. नेहा महाजन – नीलकंठ मास्तर
लक्षवेधी अभिनेता नामांकन
१. प्रशांत दामले – भो भो
२. स्वप्निल जाधव – जजमेंट
३. संजय कुलकर्णी – कोती
प्रथम पदार्पण अभिनय नामांकन
१. गश्मीर महाजनी – देऊळबंद
२. प्रितम कागणे – हलाल
३. भाऊसाहेब शिंदे –   ख्वाडा
सर्वोकृष्ट अभिनेता  नामांकन
१. सुमित राघवन – संदुक
२. अंकुश चौधरी – डबलसीट
३. मकरंद अनासपुरे – रंगा पतंगा
४. संतोष जुवेकर – एक तारा
५. गश्मीर महाजनी – देऊळबंद
सर्वोकृष्ट अभिनेत्री नामांकन
१. मुक्ता बर्वे – डबलसीट
२. मेधा मांजरेकर – नटसम्राट
३. स्मिता तांबे – परतु
४. पूजा सावंत – नीलकंठ मास्तर
५. उर्मिला निंबाळकर – एक तारा
प्रथम पदार्पण दिग्दर्शन नामांकन
१. प्रसाद नामजोशी – रंगा पतंगा
२. प्रविण तरडे – देऊळबंद
३. सुहास भोसले – कोती
४.  भाऊराव कऱ्हाडे- ख्वाडा
५. चंद्रकांत कणसे – दगडी चाळ
लक्षवेधी चित्रपट घोषित
कोती – ओम्स आर्ट्स
सामाजिक चित्रपट नामांकन
१. पोलीस लाईन
जिजाऊ क्रिएशन
२. हक्क
अॅम्बीशियस फिल्म्स
३. देऊळबंद
वटवृक्ष एंटरटेनमेंट प्रा. लि.
लोकप्रिय चित्रपट नामांकन
१. दगडी चाळ – साईपूजा फिल्म आणि  एंटरटेनमेंट
२. डबलसीट – हयुज प्रॉडक्शन, प्रतिसाद  प्रॉडक्शन
३. नटसम्राट – फिनक्राफ्ट मिडिया आणि गजानन चित्र
फेस ऑफ द ईयर २०१६ घोषित
स्वप्निल जोशी
स्टाईल आयकॉन २०१६ घोषित
मानसी नाईक २०१६
विशेष पुरस्कार घोषित
१. अभिनय सम्राट पुरस्कार – नाना पाटेकर- नटसम्राट
 २. विशेष ज्युरी पुरस्कार – विक्रम गोखले-  नटसम्राट
मानाचा मुजरा २०१६
सचिन पिळगावकर – कट्यार काळजात घुसली
सर्वोकृष्ट चित्रपट २०१६ नामांकन
१. नटसम्राट – फिनक्राफ्ट मिडिया आणि गजानन चित्र
२. कट्यार काळजात घुसली – श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस
३. ख्वाडा – चित्राक्ष निर्मिती
४. हलाल – अमोल कागणे फिल्मस
५. रंगा पतंगा – फ्लाईंग गाॅड फिल्मस
६. मितवा – मीनाक्षी सागर प्रोडक्शन
मालिका विभाग नामांकन
 सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन
१. सुरेखा कुडची – चीत्रकथी – दूरदर्शन
२. समिधा गुरु – कमला – कलर्स मराठी
३. अश्विनी एकबोटे – दुर्वा – स्टार प्रवाह
४. विभावरी प्रधान – सुशिलेचा देव – दूरदर्शन
५. श्वेता पेंडसे – अस्स सासर सुरेख बाई – कलर्स मराठी
 सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन
१. संग्राम साळवी – सरस्वती- कलर्स मराठी
२. अविष्कार दारव्हेकर – दुर्वा – स्टार प्रवाह
३. माधव देवचक्के – सरस्वती – कलर्स मराठी
४. अभिजित चव्हाण – अस्स सासर सुरेख बाई – कलर्स मराठी
५. जयंत सावरकर – माती कोकणची नाती जन्माची – दूरदर्शन
प्रथम पदार्पण अभिनेत्री
तितिक्षा तावडे
सरस्वती – कलर्स मराठी
सर्वोकृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – घोषित
कॉमेडीची बुलेट ट्रेन – कलर्स मराठी
सर्वोकृष्ट अभिनेता नामांकन
१. चिन्मय मांडलेकर – तू माझा सांगाती
२. रमेश भाटकर – माती कोकणची नाती जन्माची-  दूरदर्शन
३. अभिजित आम्कर – अरे वेड्या मना – – स्टार प्रवाह
४. आस्ताद काळे – सरस्वती – कलर्स मराठी
५. संतोष जुवेकर – अस्स सासर सुरेख बाई – कलर्स मराठी
सर्वोकृष्ट अभिनेत्री नामांकन
१. ऋता दुर्गुले – दुर्वा – स्टार प्रवाह
२. नुपूर परुळेकर- अरे वेड्या मना – स्टार प्रवाह
३. मृणाल दुसानिस –  अस्स सासर सुरेख बाई – कलर्स मराठी
४. सायली पाटील- गणपती बाप्पा मोरया- कलर्स मराठी
५. प्रमिती नरके – तू माझा सांगाती – कलर्स मराठी
सर्वोकृष्ट दिग्दर्शक नामांकन
१. वैभव चिंचाळकर – चीत्रकथी – दूरदर्शन
२. संगीत कुलकर्णी –  तू माझा सांगाती  – कलर्स मराठी
३. अवधूत पुरोहित – अरे वेड्या मना –  स्टार प्रवाह
४. रघुनंदन बर्वे – अस्स सासर सुरेख बाई – कलर्स मराठी
५. चंद्रकांत गायकवाड – गणपती बाप्पा मोरया- कलर्स मराठी
६. उमेश नामजोशी – प्रीती परी तुझ वरी-  स्टार प्रवाह
लक्षवेधी मालिका नामांकन
१. चीत्रकथी – ऐश्वर्या आर्ट अँड विजन – दूरदर्शन
२.  गणपती बाप्पा मोरया- कलर्स मराठी
३. प्रीती परी तुझ वरी-  स्टार प्रवाह
४. माती कोकणची नाती जन्माची-  – दूरदर्शन
५. एक नंबर – स्टार प्रवाह
सर्वोकृष्ट मालिका नामांकन 
१. सरस्वती – मिडिया माँक्स एंटरटेनमेंट प्रा. लि. – कलर्स मराठी
२. अरे वेड्या मन – सिने मंत्रा – स्टार प्रवाह
३. अस्स सासर सुरेख बाई – सेवेन्थ सेन्स मिडिया-  कलर्स मराठी
४. रुंजी – टेल अ टेल मिडिया- स्टार प्रवाह
५. तू माझा सांगाती – रुची फिल्म्स-  कलर्स मराठी
वृत्तवाहिनी विभाग नामांकन 
सर्वोकृष्ट सूत्रधार पुरुष नामांकन
१. विशाल परदेशी – आय. बी. एन. लोकमत
२. प्रशांत अनासपुरे- झी २४ तास
३. अमोल परचुरे – आय. बी. एन. लोकमत
४. अमित भंडारी- एबीपी माझा
५. कपिल देशपांडे –  झी २४ तास
सर्वोकृष्ट सूत्रधार स्त्री नामांकन
१. ऋतुजा सावंत- महाराष्ट्र वन
२. नीलिमा कुलकर्णी – आय. बी. एन. लोकमत
३. राखी शेळके – एबीपी माझा
४. प्रेरणा जंगम – टीव्ही ९ महाराष्ट्र
सर्वोकृष्ट कथाबाह्य नामांकन
१. ढँण टॅ  ढँण – एबीपी माझा
२. शो टाईम –  आय. बी. एन. लोकमत
३. फर्स्ट डे फर्स्ट  शो –  झी २४ तास
सर्वोकृष्ट न्यूज चॅनल नामांकन
१.  झी २४ तास
२. आय. बी. एन. लोकमत
३. एबीपी माझा
४. टीव्ही ९ महाराष्ट्र
५. महाराष्ट्र वन
पत्रकारिता पुरस्कार घोषित
जयंत पवार
महाराष्ट्र टाईम्स
पत्रकारिता घोषित पुरस्कार
सर्वोकृष्ट पी. आर .
 अमृता माने
औदुंबर एंन्टरटेनमेंन्टस

Related Articles

Leave a Reply

Back to top button