Home > Marathi News > श्रेयशच्या ‘टाईमपास रॅप’ मधून खरीखुरी बात

श्रेयशच्या ‘टाईमपास रॅप’ मधून खरीखुरी बात

SHREYASH JADHAV
SHREYASH JADHAV
मराठीतील पहिला रॅपर ‘किंग जेडी’ अर्थात श्रेयश जाधव बऱ्याच काळाने एक भन्नाट रॅप सॉंग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘टाईमपास रॅप ए, हा टाईमपास रॅप ए’ असे बोल असणाऱ्या या गाण्यामध्ये सामाजिक विषय अतिशय मार्मिक पद्धतीने हाताळण्यात आले आहेत.
आपल्या अनोख्या रॅप सॉंगने  तरुणाईला वेड लावणाऱ्या श्रेयशने ‘मी पण सचिन’ या चित्रपटातून दिग्दर्शनात यशस्वी पाऊल टाकत, प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर परत श्रेयश आता नवीन रॅप सॉंग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या रॅपमध्ये श्रेयशचे गाण्याला साजेशे असे वेगवेगळे लुक्स बघायला मिळत आहेत, मुळात या गाण्यात सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या अधोरेखित करण्यात आल्यामुळे सामान्य माणसाला हे गाणे अधिकच जवळचे वाटेल.
श्रेयश आपल्या रॅप सॉंगमध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतो, विविध भाषांचा वापर करतो. त्यामुळे यात आपल्याला विदर्भीय भाषेचा लहेजा अनुभवयाला मिळेल. या गाण्याचे दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांचे आहे. तर ‘टाईमपास रॅप’ला हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर या त्रिनीती ब्रदर्सचे संगीत लाभले असून हे गाणे व्हिडिओ पॅलेसच्या युट्युब चॅनेलवर पाहता येणार आहे. ‘टाईमपास रॅप’ सॉंग प्रेक्षकांना  चांगलेच आवडत आहे.

About justmarathi

Check Also

Makeup Movie Song

पूर्वी- नीलचा साखरपुडा दणक्यात संपन्न ‘मेकअप’ चित्रपटातील ‘गाठी गं’ गाणे प्रदर्शित

संगीताची धून… फुलांची सजावट… एकदंरच सगळ्यांची लगबग… आणि रंगीबेरंगी, आनंदी, उत्साही वातावरण. निमित्त होते पूर्वी …

Leave a Reply