Marathi News

व्हेंटिलेटर म्हणजे सुंदर कादंबरी वाचल्याची अनुभूती

raj-thackeray-with-ventilator-team

बाबा आणि मुलाच्या नात्याला हळूवार स्पर्श करणारा चित्रपट “व्हेंटिलेटर”… गेल्या 4 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून याचे कौतुक झाले. सगळ्याच वयोगटातील प्रेक्षकांकडून दिग्दर्शक राजेश मापुसकर यांची कथा आणि दिग्दर्शन यांच्यावर भरभरून प्रेम केले गेले. अचूक जुळून आलेली ही व्हेंटिलेटर ची भट्टी प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतर ही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मिडीयावर प्रेक्षकांच्या भावूक प्रतिक्रियांना उधाण आले होते. यासाठी कृतकृत्य असतानाच रसिक मनाच्या माननीय राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेने दिग्दर्शक राजेश मापुसकर भारावून गेले आहेत. “हा चित्रपट बघताना, मी एखादं सुंदर पुस्तक वाचत असल्याचं मला वाटत होतं. या चित्रपटाच्या कथेचा प्रवाह वाहता आहे….निखळ आनंददायी, जो आपल्याला बांधून ठेवते.”

असे माननीय राज ठाकरे यांनी व्हेंटिलेटर पाहिल्यानंतर म्हटलं आहे. तर चित्रपट पाहण्याआधीच व्हेंटिलेटरविषयी बऱ्याच चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर राज साहेबांनी मला भेटायला बोलावले आणि आम्ही व्हेंटिलेटरविषयी चर्चा केल्याचे दिग्दर्शक राजेश मापुसकर म्हणाले. त्यांच्या कौतुकाने व्हेंटिलेटर चित्रपटाला मिळणाऱ्या यशाचा आनंद द्विगुणित झाल्याचेही ते म्हणाले. चित्रपट पाहिल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया ‘सोने पे सुहागा’असल्याचं ते म्हणतात. दरम्यान शूटींगसाठी हॉस्पिटल मिळवण्यामध्ये राज साहेबांच्या झालेल्या मदतीसाठी टीम व्हेंटिलेटर त्यांची आभारी असल्याचेही ते म्हणाले.”

4 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि डॉ. मधू चोप्रा यांनी केले असून निर्मितीबरोबरच प्रियंकाने या चित्रपटात अभिनयही केला आहे. त्याशिवाय आशुतोष गोवारीकर बरोबर जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी – मोने, सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, स्वाती चिटणीस, विजू खोटे, निलेश दिवेकर अशी मोठी फौज पाहायला मिळते आहे.

बाबा आणि मुलगा या नात्याबाबत तितकसं बोललं जात नाही… हा अबोला राजेश मापुसकर यांच्या व्हेंटिलेटर चित्रपटाने तोडल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तुमच्यातला आणि तुमच्या बाबांमधला अबोला दूर करण्यासाठी नक्की पहा झी स्टुडिओज् प्रस्तुत आणि पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित “व्हेंटिलेटर” तुमच्या जवळच्या सिनेमागृहात..

Related Articles

Leave a Reply

Back to top button