लाईफ एन्जॉय करायला लावणा-या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा टीझर प्रदर्शित
माणसांचे इमोशन्स चेंज करायला शब्दच पुरेसे आहेत आणि याचीच झलक दाखवायला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’. अमोल उतेकर प्रस्तुत, स्टेलारीया स्टुडीयो निर्मित आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. प्रेम प्रकरण आणि लग्न तसेच प्रेयसी आणि बायको यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे मजेशीररित्या या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.
या टीझरमध्ये प्रेक्षक कलाकार सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल यांच्या भन्नाट अभिनयाची झलक पाहू शकतात. तसेच आदर्श शिंदेच्या आवाजातील एक नवीन, दमदार गाणं या टीझरमधून ऐकायला मिळाले त्यामुळे या गाण्याविषयी उत्सुकता नक्कीच वाढली असणार. या टीझरमधला सर्वात आकर्षक आणि मनोरंजक सीन म्हणजे गुरुच्या भूमिकेत असलेल्या महेश मांजरेकर यांचा अभिनय आणि डायलॉग. या सर्व गोष्टींमुळे या चित्रपटाचा टीझर सोशल मिडीयावर आणि प्रेक्षकांच्या मनात तुफान गाजणार यात शंका नाही.
लाईफ एन्जॉय करायला शिका नाही तर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ असं सांगू इच्छिणा-या चित्रपटात कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत, गौरव मोरे या कलाकारांच्या देखील प्रमुख आहेत.
नवीन वर्षात धमाकेदार आणि मजेशीर विनोदामुळे महाराष्ट्राचे मनापासून मनोरंजन करणा-या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाची कथा प्रदिप मेस्त्री यांनी लिहिली असून हा चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
https://www.youtube.com/watch?v=pZiuTKJu0pI&feature=youtu.be