Marathi News

रॅपर श्रेयश जाधव करणार चित्रपटाचे लेखन – दिग्दर्शन

shreyash jadhav
shreyash jadhav

मराठी रॅपचा चेहरा म्हणून ओळखला जाणारा किंग जेडी म्हणजेच श्रेयश जाधव, चित्रपट निर्मितीबरोबरच आता आपल्या लेखन-दिग्दर्शनाने लोकांचे मनोरंजन करणार आहे असे कळून येते. गणराज असोसिएट्सच्या बॅनरखाली सुपरहिट सिनेमाची निर्मिती करणा-या श्रेयशला मराठी सिनेसृष्टीत तरुण निर्माता म्हणून संबोधले जाते, तसेच आता त्याने दिग्दर्शनात आपले पाऊल टाकले असून तरुण लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आपली नवी ओळख निर्माण करायला तो सज्ज झाला आहे.  या व्यतिरिक्त त्याचे ‘ पुणे रॅप’ आणि ‘वीर मराठे’ यांसारखे धडाकेबाज रॅपदेखील लोकांना आवडत असल्यामुळे, त्याच्या लेखन आणि दिग्दर्शकीय नजरेतून साकार होत असलेल्या त्याच्या पहिल्याच सिनेमाचे त्याच्या चाहत्यांना उत्सुकता नसेल तर नवलच !
चित्रपटाचा निर्माता म्हणून असो वा रॅपर सिंगर म्हणून असो, श्रेयशला रसिकांचे आतापर्यंत अमाप प्रेम लाभले आहे, त्यामुळे त्याचे दिग्दर्शकीय पाऊल कुतूहलाचा विषय ठरणार आहे. ह्या सिनेमाच्या चित्रिकरणाला लवकरच सुरूवात होणार असून, शीर्षक आणि स्टारकास्टबाबत तुर्तास मौन पाळण्यात आले आहे. त्यामुळे श्रेयशकडून लेखक-दिग्दर्शक म्हणून एका नवीन धाटणीचा सिनेमा लोकांना बघायला मिळेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button