रितेश विकणार उत्तर स्टार प्रवाहच्या ‘विकता का उत्तर’ रिअॅलिटी शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण ७ ऑक्टोबर पासून प्रसारण

riteish-deshmukh-1

बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलेला स्टार अभिनेता रितेश देशमुख आता छोट्या पडद्यावर दिमाखातपदार्पण करतो आहे. रितेशच्या छोट्या पडद्यावरील एन्ट्रीची टीव्ही इंडस्ट्रीत बरीच चर्चा आहे. स्टार प्रवाहच्या विकता का उत्तर या नव्याकोऱ्यारिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन रितेश करत असून, ७ ऑक्टोबरपासून सायंकाळी ७.३० वाजता हा रिअॅलिटी शो दाखल होत आहे.

‘स्टार प्रवाह’नं वैविध्यपूर्ण आणि आशयसंपन्न मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी असलेलं नातं जपलं आहे. स्टार प्रवाहचं ‘आता थांबायचं नाही’ हेब्रीदवाक्य पुढे घेऊन जाण्याचं काम ‘विकता का उत्तर’ हा कार्यक्रम करणार आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांचा वीकेंड आनंददायी आणि मनोरंजककरणार असून दर शुक्रवार ते रविवार १ तास हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रोजच्या जगण्यातील घासाघीस आपल्यासाठी कशीफायदेशीर ठरू शकते या भन्नाट  कल्पनेवर ‘विकता का उत्तर’ आधारला आहे. एखाद्या वस्तूची खरेदी विक्री करताना आपण वेगवेगळ्या पद्धतीनंमनासारखा भाव करण्याचा प्रयत्न करतो.त्याच पद्धतीने एखाद्या प्रश्नाचं उत्तर विकत घेण्यासाठी भाव करायला किती वाव आहे हे या कार्यक्रमातूनकळणार आहे. बुद्धिमत्ता आणि चातुर्याचा कस या कार्यक्रमात लागणार आहे.

आपलेपणानं संवाद साधणाऱ्या रितेशनं स्वत:चा असा प्रेक्षक निर्माण केला आहे. मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरू शकतो हेदाखवून दिल्यानंतर त्यानंही आता थांबायचं नाही असंच ठरवलं आहे. म्हणूनच तो घराघरात पोहचणाऱ्या छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.छोट्या पडद्यावरचं पदार्पण आणि या कार्यक्रमाविषयी रितेश म्हणतो, ”विकता का उत्तर’ कार्यक्रम माझ्यासाठी नक्कीच एक वेगळा प्रयोग आणिअनुभव ठरेल. माझ्या करियरच्या सुरुवातीच्या काळात स्टार प्लस सोबत काम केलं होतं. आता मराठीतील टेलिव्हिजनवरील पदार्पणाठी स्टारप्रवाह माझ्यासोबत असणं हा खरंच खूप चांगला योग आहे.’ स्टार प्रवाहनं प्रेक्षकांच्या आवडीनुसार सातत्यानं प्रयोग केले आहेत. या  अनेक यशस्वीआणि भरघोस प्रतिसाद लाभलेल्या कार्यक्रमांच्या यादीत ‘विकता का उत्तर’ अग्रस्थानी राहील, असा विश्वास स्टार प्रवाहनं व्यक्त केला.

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply