Marathi News

‘माऊली’ चित्रपटातून ‘माझी पंढरीची माय’ गाण्याद्वारे रितेश देशमुख सह अजय-अतुल करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण!

 

अनेक हिंदी अभिनेत्यांना रुपेरी पडद्यावर आपल्या संगीताच्या तालावर नाचायला लावणारी विख्यात संगीतकार जोडगोळी अजय-अतुल आता ‘माऊली’  या रितेश देशमुखनिर्मित आगामी मराठी चित्रपटात झळकताना दिसून येणार आहेत.

रितेश देशमुख यांच्या विनंतीचा मान राखून अजय-अतुल या संगीतकार बंधूंनी ‘माझी पंढरीची माय’ या गाण्याद्वारे रुपेरी पडद्याची शोभा आणखीन द्विगुणित केलेली आहे. चित्रपटादरम्यान या गाण्याचे शूटिंग सुरु असतानाच रितेश देशमुख यांनी अजय-अतुल आणि चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री सैय्यमी खेर यांच्यासह एक खास प्रचारात्मकव्हिडिओ शूट केला आहे.

रितेश देशमुख म्हणतात की, “अजय-अतुल या संगीतकार जोडीस मी या भक्तिपूर्ण गाण्याचे संपूर्ण संक्षिप्त स्वरूप दिले होते आणि त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या संगीत रचनांनीआश्चर्यचकित करून सोडले. मी त्यांना दिलेल्या गाण्याच्या संक्षिप्त माहितीच्या अगदी उलट असं गाणं त्यांनी माझ्यासमोर प्रस्तुत केलं. खरंतर त्यांच्या संगीत रचनेने आमच्याचित्रपटाच्या पटकथेचा आढावा घेतला व चित्रपटाच्या चांगल्यासाठीच त्यात बदल केले.”

‘माझी पंढरीची माय’ या गाण्याद्वारे रुपेरी पडद्यावरील पदार्पणाबद्दल सांगताना अजय गोगावले म्हणतात की, “या व्हिडिओत आम्ही असावं, ही रितेशची ईच्छा होती.” तरअतुल गोगावले सांगतात की, “रितेशने आम्हाला गाणी तयार करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य दिले. सैराट (२०१६) नंतर आता पुन्हा ‘माऊली’ या मराठी चित्रपटासाठी काम करण्यासआम्हाला खूप आनंद झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button