महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या दुस-या पर्वाला ७ जानेवारीपासून सुरूवात

 

विनोद हा प्रत्येकासाठी निराशा घालवण्याचा उत्तम उपाय असतो. आपण कितीही गंभीर परिस्थितीत असलो तरी विनोद ऐकताच चुटकी सरशी आपण लगेच हसतो. खरं तर, हसणे हे आपल्या आरोग्यासाठी पण उपयोगी असते. आणि सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कॉमेडी शो ने  महाराष्ट्राला पोटभर हसायला भाग पाडून महाराष्ट्राला फिट आणि फाईन ठेवले. मजेशीर, भन्नाट विनोदवीरांनी या मंचावर एका पेक्षा एक अफलातून कॉमेडी स्किट सादर करुन हास्य कल्लोळ केला.

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी आणलं आहे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चं दुसरं पर्व. या कार्यक्रमाचे पहिले पर्व नुकतेच संपले असून प्रेक्षकांना दुस-या पर्वाची गोड बातमी दिल्यावर पुन्हा एकदा तिच कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांची कुतुहलता निर्माण होणार.

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुस-या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. आणि ते म्हणजे जजेस सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुध्दा हा कार्यक्रम जज करणार आहेत आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार.

आठवड्यातील चार दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज असणा-या या दुस-या पर्वाचे दोन वेगळे फॉरमॅट आहेत. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’ हा फॉरमॅट असून महेश कोठारे या दोन दिवसांचे परफॉर्मन्स जज करणार आहेत.  सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, अरुण कदम आणि अंशुमन विचारे हे सहा सेलिब्रिटी कलाकार आणि ८ नवीन कॉमेडीयन्स/ विनोदी कलाकार एकत्र परफॉर्मन्स करणार आहेत. आणि या दुस-या पर्वाच्या शेवटी महेश कोठारे ठरवणार दोन ‘कॉमेडीचे जहागिरदार’.

मंगळवार नंतर मनोरंजनाची गाडी चालू ठेवत सर्व कलाकार मंडळी बुधवार आणि गुरुवारला करणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा- रथी महारथींचा हास्यकल्लोळ’. कार्यक्रमाच्या या दुस-या सेलिब्रिटी फॉरमॅटमध्ये सुप्रसिद्ध कॉमेडियन/ विनोदी कलाकार आणि या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे

विजेते या दोन दिवसांत स्किट सादर करणार आहेत. या फॉरमॅटचे परीक्षण सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक करणार असून ‘परफॉर्मर ऑफ दि विक’ देखील तेच निवडणार आहेत.

या फॉरमॅटमध्ये सेलिब्रिटी जोडी अशी असेल- समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर आणि संदीप गायकवाड, अरुण कदम, श्याम राजपुत आणि सुलेखा तळवळकर, अंशुमन विचारे, रोहित चव्हाण आणि रसिका वेंगुर्लेकर, गौरव मोरे आणि वनिता खरात, श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर.

तसेच, होस्ट आणि दोस्त असलेली प्राजक्ता माळी पुन्हा एकदा तिच्या नटखट स्वभावाने या कार्यक्रमाचे निवेदन करणार. त्यामुळे दुसरे पर्व तितक्याच ताकदीने पुन्हा प्रेक्षकांसाठी हजर होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ने झाली असून प्रेक्षकांना दुसरे पर्व ७ जानेवारीपासून सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply