Marathi News

मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवतोय, सिक्स पॅक एब्ज असलेला रांगडा हिरो ‘जीत’

 

बॉलीवुडमध्ये सलमान खान, अक्षय कुमार, हृतिक रोशन ते अगदी टायगर श्रॉफ पर्यंत अनेक सिक्स पॅक्स असलेले हिरो आहेत. पण आता मराठीतही सहा फुट उंच आणि सिक्सपॅक एब्ज असलेला हिरो डेब्यु करतो आहे. ह्या हँडसम हंकचे नाव आहे, जीत.

जीत लवकरच फ्युचर एक्स प्रॉडक्शन्स आणि जे सेव्हन प्रोडक्शन्सच्या ‘फाइट’ ह्या मराठी एक्शनपटातून फिल्म इंडस्ट्रीत डेब्यु करत आहे.

फाइट सिनेमाचे दिग्दर्शक जीमी मोरे सांगतात, “बॉलीवुडमध्ये सिक्स पॅक एब्ज असणारे हिरो आहेत. त्यामुळे तिथे एक्शनपटही बनतात. मराठीत असलेल्या हिरोंचा बांधा पाहता, असे सिनेमे मराठीत येऊ शकत नाहीत. त्यामुळेच स्वप्नील महालिंगने लिहीलेली ही फाइट फिल्म दिग्दर्शित करायचे मी ठरवले तेव्हा मला अशा हिरोचा शोध होता. जो चांगलाच उंचापुरा असेल आणि त्याची बिल्टही चांगली असेल.”

जीतविषयी सांगताना जीमी मोरे म्हणतात, “जीतचा रस्टिक लुक त्याचप्रमाणे त्याची पिळदार देहयष्टी हा सिनेमाचा महत्वाचा भाग आहे. ह्या सिनेमातल्या फाइट्सही त्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वामूळे वास्तववादी वाटतील.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button