मराठी मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी अमित्रियान सज्ज – Rajwade & Sons

मराठी मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी अमित्रियान सज्ज - Rajwade & Sons
मराठी मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी अमित्रियान सज्ज – Rajwade & Sons

सचिन कुंडलकर लिखित-दिग्दर्शित राजवाडे अँड सन्स या चित्रपटात अमित्रियान उच्चभ्रू कुटुंबातील तरूणाची भूमिका साकारतो आहे. जुन्या पिढीचा जुना आग्रह आणि नवीन पिढीची महत्त्वाकांक्षा… या दोन्हीतली तफावत या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे. जुन्या – नव्या पिढीतले वैचारिक अंतर…त्यामुळे माजणारा कोलाहल… राजवाडे कुटुंबियांवर पडलेलं हे सावट अमित्रियानने साकारलेला विक्रम राजवाडे आपल्या मिश्किल आणि मनमिळावू स्वभावामुळे कसा दूर करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रेक्षकांना सुखद धक्का देण्यासाठी ही मध्यवर्ती भूमिका चित्रपटाच्या प्रमोशनपासून लांब ठेवण्यात आली होती. अमित्रियानने साकारलेला विक्रम प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थी सुखद ठरतो आहे. सिनेसृष्टीतल्या दिग्गजांकडूनही अमित्रियानचा विक्रम वाह वाह मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

राजवाडे अँड सन्स या चित्रपटासाठी जेव्हा अमित्रियानला विचारण्यात आलं तेव्हा मराठी ही त्याची मातृभाषा असल्यामुळे त्याने ताबडतोब या चित्रपटासाठी होकार दिला. त्याशिवाय राजवाडे अँड सन्सच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, अतुल कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी ही त्याला चुकवायची नव्हती.

मराठमोळ्या अमित्रियानने बॉलिवूडमध्येही आपलं नाणं चोख वाजवलं आहे. के. सेरा. सेरा बॉक्स ऑफिस प्रायवेट लिमिटेड प्रस्तुत 332 – मुंबई टू इंडिया या चित्रपटात त्याने काम केले होते. संगीत सिवन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याचे अभिनयातले वेगवेगळे पैलू पाहून राम गोपाल वर्मा यांनी सत्या – 2 साठी अमित्रियानची निवड केली. त्याचा पहिला चित्रपट मन्या – दि वंडरबॉयने त्याला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलमध्ये पदार्पणासाठीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. चित्रपटातून अभिनय करण्याबरोबरचं तो एक उत्तम गिटार प्लेयरसुध्दा आहे. मन्या – दि वंडरबॉय या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण करणारा अमित्रियान… राजवाडे अँड सन्स या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या भेटीला आला आहे.

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply