Marathi News

प्रेम जात पाहून होत नाही- हर्षदा खानविलकर ‘प्रेमाला जात नसते’ स्टार प्रवाहचे ‘पुढचं पाऊल’

img_7032

स्टार प्रवाह वाहिनीवर गाजत असलेल्यापुढचं पाऊलया मालिकेनेप्रसिद्धीचा उच्चांक गाठला आहे. आजही ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरातआवडीने पाहिली जात असल्याची प्रचीती अक्कासाहेब म्हणजेच हर्षदाखानविलकर यांना कोल्हापूरमध्ये आलीया मालिकेतीलप्रेमाला जातनसतेहा नवा विचार मांडणाऱ्या सत्यजित (अमित खेडेकर) आणितेजस्विनी (आरती मोरे) यांच्यावर आधारित सुरु असलेल्या कथेने सर्वांचेचलक्ष वेधले आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातअक्कासाहेब यांनीप्रेमाला जात नसते आणि प्रेमाने जातीपातीची बंधनेपुसून टाकता येतात‘, असे मत मांडले.
पारंपारिक कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर गेले सहा वर्षे यशस्वीरीत्या सुरुअसलेल्या या मालिकेने नवे वळण घेतले आहे. आंतरजातीय प्रेम तसेचविवाहाला विरोध करणाऱ्या आपल्या समाजबहूल परिस्थितीला आव्हानदेण्याचे काम अक्कासाहेब यात करताना दिसणार आहेत. याच मुद्द्यावरसत्यजित (अमित खेडेकर) आणि तेजस्विनी (आरती मोरे) याकलाकारांसोबत कोल्हापूरदौऱ्यात नुकत्याच येऊन गेलेल्या हर्षदाखानविलकर यांनीप्रेमया शब्दांची त्यांची असलेली व्याख्या स्पष्ट केली.
पालकांनी आपल्या मुलांच्या प्रेमाला विरोध करण्याआधी काहीवेळ विचारकरायला हवा. वेळीच प्रसंगावधान दाखवून निर्णय घेतल्यास भविष्यातचुकीचा निर्णय घेतल्याचे शल्य राहणार नाही. असा सल्ला त्या सर्व पालकांनादेतात. त्याचबरोबरसंसार करणे खूप कठीण गोष्ट असते, प्रेमात पडणाऱ्याप्रत्येकाला ते जमतेच असे नाही. त्यामुळे थोरामोठ्याचे म्हणणे ऐकाअशीतरुणांची कानउघाडणी देखील त्या करतात. ‘प्रेमजात पाहून होत नाही,त्यामुळे प्रेमाला जातीसाठी दुय्यम लेखू नका. आपला हा संदेशप्रसारमाध्यमांनी जास्तीतजास्त लोकांपर्यत पोहोचवावा अशी विनंती त्यांनीपत्रकारांना केली. आपली संस्कृती आणि परंपरा जपतानाच आधुनिकविचारसरणीची कास धरण्याचा संदेश अक्कासाहेब या मालिकेद्वारे  देतानादिसत आहेत.विशेष म्हणजे त्यांचा हा दृष्टीकोन दिवसेंदिवस लोकप्रिय होतअसल्याचे दिसून येत आहे.
एकूणचप्रेमाला जात नसतेहा विचार स्टार प्रवाहवर सोमवार ते शनिवारसंध्याकाळी .३० वाजता प्रसारित होणाऱ्यापुढचं पाऊलया मालिकेच्यामाध्यमातून समाजात रुजवला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button