Marathi News

पोश्टर गर्लच्या दिलखेचक अदांनी अनिकेत झाला गोरा – मोरा

1C7A7450

हॅन्डसम, डॅशिंग, रोमँटिक अशी विशेषण लाभलेला अनिकेत विश्वासराव गेली बरीच वर्ष अगदी सहज तरूणींच्या मनाचा ठोका चुकवतोय…मात्र वायकॉम18 मोशन पिक्चर्सच्या ‘पोश्टर गर्ल’मधून एक वेगळाच अनिकेत आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. नेहमीच बिनधास्त, बेधडक वाटणारा अनिकेत पोश्टर गर्लमध्ये तरूणींपासून लांब पळताना दिसतोय. आणि असाच पळता पळता तो धडकला आहे…’पोश्टर गर्ल’ला…

पोश्टर गर्लमध्ये अनिकेत ने साकारला आहे… ‘बजरंग दुधभाते’…व्यायाम करून चांगले शरीरसौष्ठव कमवणे…येवढाच काय तो यांचा ध्यास…मुळचे शेतकरी असणाऱ्या या बजरंगरावांनी आता फक्त व्यायामाकडे लक्ष केंद्रित केले आहे.

पोश्टर गर्लच्या काकांनी तिच्या स्वयंवरासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांपैकी हे आपले दुसरे उमेदवार…कॉलेजमध्ये मुली असतात म्हणून शिक्षण अर्धवट सोडणारे बजरंगराव पोश्टर गर्लसाठी काय काय करतात…हे पहा येत्या 12 फेब्रुवारीला तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात…

वायकॉम18 मोशन पिक्चर्स पोश्टर गर्ल

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button