Marathi News

पुण्याच्या सचिन शेलार यांनी मारली ‘विकता का उत्तर’ च्या अंतिम टप्प्यात मजल

sachin-shelar

महाराष्ट्रातील सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सेलिब्रिटी बनवणारा ‘विकता का उत्तर’ या क्वीज शोचा संपूर्ण महाराष्ट्राला रंग चढला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या नव्या दमाच्या कार्यक्रमातील विविध स्पर्धकांमुळेदेखील हा कार्यक्रम गाजत आहे. मराठी माणसांच्या व्यवहार कुशलतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची तोंड बंद करणाऱ्या या कार्यक्रमात अनेकांनी आपले नशीब आजमावले आहे. या कार्यक्रमाचा आजचा भाग देखील तितकाच रंजक आणि बौद्धिक कौशल्यतेचा ठरणार आहे. आजच्या शुक्रवारच्या भागात ‘विकता का उत्तर’ मध्ये पुण्याच्या सचिन शेलारची विशेष कामगिरी पाहायला मिळणार आहे. शारीरिक विकलांग असणाऱ्या या स्पर्धकाने  ट्रेडर्सच्या मदतीशिवाय शोच्या अंतिम प्रश्नापर्यंत बाजी मारली.

सचिन शेलार यांनी सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळी खेळत रसिकांना अचंबित केले होते. प्रश्नोत्तराच्या खरेदी-विक्रीच्या या शोमधील ट्रेडर्स देखील सचिन शेलार यांची खेळी अवाक होऊन पाहत होते. प्रत्येक प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्या या अवलियाचा खुद्द रितेश देशमुख देखील फेन झाला. सचिन या नावाला साजेल अशी खेळी खेळणारे हे पहिलेच स्पर्धक आहेत जे ‘विकता का उत्तर’ च्या शोमध्ये अंतिम टप्प्यांपर्यंत जाऊ शकले ! विकता का उत्तरच्या पिचवर त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पैशांचा अक्षरश: पाऊस पाडलेला दिसून येणार आहे. सचिन हे व्यवसायाने इंजिनीअर असून, बर्कलेस टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये ते असिस्टंट वाईस प्रेसिडेंट पदावर काम करतात. यशस्वी होण्यासाठी बुद्धि आणि आकलन क्षमतेची कास महत्वाची असते, कोणतीही शारीरिक व्याधी तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही, असा संदेश ते लोकांना देतात. हे स्पर्धक या क्वीज शो चे पहिले महाविजेते ठरणार का? हे पाहणे रंजक ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button