Marathi News

निक-प्रियंका लग्नाच्या बातम्यांमूळे प्रियंका चोप्रा झाली सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी!

 

गेल्या काही दिवसांमध्ये प्रियंका चोप्राच्या लग्नविषयक बातम्या रोज भारतीय मीडियामध्ये छापून येत आहेत. इंटरनॅशनल सिंगर निक जोन्स आणि ग्लोबल आयकन प्रियंका चोप्राच्या लग्नाशी संबंधित घडामोडी वर्तमानपत्राच्या मथळ्यांमध्ये सतत दिसून आल्याने स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर न्यूजप्रींट मीडियामध्ये प्रियंका सर्वाधिक चर्चित अभिनेत्री झाली आहे.

निकयांकाच्या लग्नात कोण-कोण सेलेब्स येणार, लग्न कुठे, केव्हा होणार.. ते अगदी वर-वधु कोणती डिझाइनर वस्त्र परिधान करणार , अशा अनेक बातम्या गेल्या आठवड्याभरात सातत्याने प्रत्येक भारतीय वृत्तपत्रात होत्या. त्यामूळेच गेल्या काही आठवड्यांमध्ये मीडीयामध्ये सर्वाधिक चर्चित राहिलेल्या दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर आता प्रियंका आणि निकचा विवाह चर्चेत आलाय. ह्यामूळेच तर गेल्या आठवड्यात तिस-या स्थानी असलेली प्रियंका अचानक लोकप्रियतेत अग्रणी स्थानावर आली आहे.

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “निक जोन्स आणि प्रियंका चोप्रा दोघांचीही लोकप्रियता विश्वभरात आहे. ह्यामूळेच वृत्तपत्रांमध्ये दीपिका-रणवीरपेक्षा जास्त निकयांकाला प्रसिध्दी मिळत असलेली दिसतेय. प्रियंकाचा शाही विवाह आणि दरदिवशी त्याविषयक येत असलेल्या बातम्यांमूळे प्रियंका न्यूजप्रिटमध्ये सर्वाधिक चर्चित स्टार बनली आहे. “

अश्वनी कौल सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button