“छंद प्रितीचा” च्या बोर्डावर हाऊसफुल्ल ची पाटी
कोणताही सिनेमा एखाद्या श्रेणीसाठी बनतो… एका वयोगटासाठी बनलेला सिनेमा दुसऱ्या वयोगटातील व्यक्तींना तितकासा रूचतनाही. मात्र चांगल्या कलाकृती याला नेहमीच अपवाद ठरतात. प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ हा सिनेमा त्यापैकीच एक… ज्याला वयाचंबंधन नाही. उत्तम कथानक, उत्कृष्ट अभिनय, सुमधूर संगीत आणि कलात्मक नृत्याच्या जोरावर या चित्रपटाने बाजी मारली आहे. सिनेसृष्टीतीलमान्यवर, कलाकार यांच्याबरोबरच प्रेक्षकांनी सलग तिस-या आठवड्यात चित्रपटाला विशेष पसंती दिली आहे.
शाहीर सत्यवानाच्या लेखणीतून अवतरलेली श्रृंगारिक लावणी, शाहीरी लावणी, सवाल – जवाब यासारख्या गीतांवर नृत्यांगना चंद्राच्यालावणीचं दिलखेचक सादरीकरण प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठोका चुकवण्यात यशस्वी झाला आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला विशेष दाद दिली आहे.महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात प्रेक्षकांनी लावण्यांचा आनंद घेतला आहे. २५० हून अधिक चित्रपटागृहामध्ये हा सिनेमाप्रदर्शित झाला असून तो हाऊसफुल चालला आहे. गावापासून शहरापर्यंत प्रत्येक व्यक्तीचं मनोरंजन करणा-या तमाशाचा आनंद रसिकांनी याचित्रपटाच्या माध्यमातून घेतला आहे.
रसिकमनांवर लावणीची जादू करणा-या चंद्रकांत जाधव निर्मित, आणि एन रेळेकर दिग्दर्शित छंद प्रितीचा हा संगीतमय प्रवास तुम्हीअजून अनुभवला नसेल तर नक्की अनुभवा.