Marathi News

‘गुरु’च्या  तालावर थिरकायला सज्ज होणार महाराष्ट्र 

Guru Images 2

दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दिग्दर्शनाची झलक आपल्याला ‘गुरु’ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. त्याच्या अप्रतिम दिग्दर्शनाने सिनेमात एक वेगळीच लकाकी येते. दिग्दर्शनाची एक अनोखी स्टाईल संजय जाधव यांनी निर्माण केली आहे. त्याच्या दिग्दर्शनाची आणखी एक छटा गुरु सिनेमात पाहायला मिळणार आहे. २२ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या गुरु सिनेमाची निर्मिती इरॉस इंटरनॅशनल, बॅगपायपर सोडा आणि ड्रीमिंग ट्वेंटी फोर सेव्हनने केली असून हा सिनेमा येत्या वर्षातील धमाकेदार फिल्म असेल. एंटरटेनमेंटचं कमप्लीट पॅकेज असलेला डॅशिंग गुरु प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल यात शंका नाही. एका मागोमाग एक सुपरहिट सिनेमे देणारा आणि महाराष्ट्राचा लाडका सुपर हिरो अभिनेता अंकुश चौधरी या सिनेमातून आपल्याला झकास लुकमध्ये दिसणार आहे. त्याचा हाच बेस्ट लूक आणि त्याची सिनेमातील भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचाविणाऱ्या धमाकेदार टायटल साँग लाँच करण्यात आलं. अंधेरी येथील इरॉस इंटरनॅशनलच्या प्रीविव्ह्यू थिएटरमध्ये या गाण्याचा पहिला वहिला लूक सिनेमातील कलाकारांनी एकत्र अनुभवला.  यावेळी उमेश जाधव यांच्या तालावर आणि अमितराज यांच्या संगीतावर अंकुश चौधरी, संजय जाधव तसेच अमितराज आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमने ताल धरला.

या कार्यक्रमाची खासियत म्हणजे गुरूच्या सगळ्या टीमने तसेच उपस्थित कलाकारांनीही  ‘गुरु’ स्टाईलचे रीफ्लेक्टर गॉगल्स लावले होते. आणि त्यामुळेच संपूर्ण वातावरण ‘गुरुमय’ झालं होतं. या धमाकेदार सॉंग लाँचनंतर गुरु सिनेमाच्या ऑफिशियल पोस्टरचे लाँच अंकुश आणि संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. हे धडाकेबाज आणि श्रोत्यांना आपसूक ताल धरायला लावणारं गाणं मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या गायक, संगीतकार आणि गीतकार या त्रिकुटाने केलं आहे. गीतकार सचिन पाठक (यो) यांनी लिहिलेल्या “हुं बडे जिगरवाला थोडासा हू चालू,  जेंटलमन में हू सबका गुरु!”… या गाण्याला गायक आदर्श शिंदे यांनी तुफान आवाज दिला आहे. मराठी चित्रपटातील आघाडीचे संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी दिलेलं  हे गाणं प्रेक्षकांच्या नक्की पसंतीस उतरेल. वर्षाच्या सुरुवातीला अमितराज यांचं हे गाणं सुपर डूपर ठरून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात तुफान कल्ला करेल यात शंका नाही. अंकुशवर चित्रित झालेल्या या गाण्या बद्दल त्याला यावेळी विचारले असता, तो म्हणाला की, “हिरोच्या एन्ट्रीचं सॉंग करायला मिळालं याचा आनंद मला वाटतो, कलरफुल गुरु तुम्हाला या गाण्यातून पाहायला मिळेल.हर्षदा खानविलकर आणि कश्मिरा यांनी मिळून गुरुच्या लूकवर मेहनत घेतली आहे. लोकांना अफोर्ड होणारी स्टाईल या सिनेमाच्या निमित्ताने मिळणार आहे. गुरूची खासियत म्हणजे एक नवी स्टाईल स्टेटमेंट या सिनेमातून लोकांना पाहायला मिळणार आहे.

संजय जाधव यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव हा खूप छान होता, यानंतर अनेक सिनेमे त्यांच्यासोबत करायची इच्छा आहे.”   तर संजय जाधव यांनी सांगितले की, “माझं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं कि, हिरोची एक तरी फिल्म आपण करावी, ज्यात फक्त आणि फक्त हिरोलाच जास्त महत्व मिळायला हवं. त्यानुसार स्क्रिप्टवरती काम सुरु केलं आणि त्यातूनच गुरुची निर्मिती झाली.  गुरूचा टायटल साँग बनवताना हिरोला फोकस ठेवण अपेक्षित होतं, त्यामुळे या उद्देशानेच मी अमितराजला गाण कंपोझ करायला सांगितलं. अमितराज याने अपेक्षेप्रमाणे खूपच छान गाणं तयार केलं आहे.”  गुरु सिनेमाच्या या टायटल साँगच्या टीझरला सोशल साईटवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सिनेमातील या गाण्याला प्रेक्षकांकडून नक्कीच पसंती मिळेल अशी आशा गुरु सिनेमाच्या टीमने व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button