Marathi News

इन्सपेक्टर ‘माऊली’ सर्जेराव देशमुखच्या येण्याने सुपर मंचावर होणार धमाल आणि मस्ती

 

सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली आहे. कलाकारांच्या येण्याने सुपर डान्सर्सच्या परफॉर्मन्सला चारचाँद लागले. आता पुन्हा प्रेक्षकांचे लाडके कलाकार या मंचावर धमाकेदार एण्ट्री करणार असून त्यापैकी एका कलाकाराच्या येण्याने ‘आपल्या सारखा Terror नाय’ असं नक्कीच सर्वांना वाटणार आहे. या एका डायलॉगमुळे प्रेक्षकांनी त्या पाहुणे कलाकाराचे अचूक नाव नक्कीच ओळखले असेल. तर ‘माऊली’ या आगामी मराठी चित्रपटातला इन्सपेक्टर माऊली सर्जेराव देशमुख उर्फ महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुखने या सुपर मंचावर सुपर एण्ट्री मारली आहे. रितेशसह अभिनेत्री सैयामी खेर, सिध्दार्थ जाधव, जितेंद्र जोशी आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार देखील विशेष उपस्थिती होती.

रितेश देशमुख, सिध्दार्थ जाधव यांचे अमेय वाघकडून मंचावर होणारे स्वागत, रितेश देशमुखने अमेयची केलेली नक्कल, फास्टर फेणेच्या शीर्षक गाण्यावर अमेय, रितेश आणि सिध्दार्थने केलेला डान्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पाहुणे कलाकारांच्या येण्याने सुपर डान्सर्समध्ये आलेला उत्साह या सर्व गोष्टीने परिपूर्ण आणि मनोरंजक असा खास एपिसोड प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.

‘माऊली’मधून मराठी सिनेमात पदार्पण करणारी अभिनेत्री सैयामी खेर, रितेश देशमुख, सिध्दार्थ जाधव आणि आदित्य सरपोतदार यांनी छोट्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्सला दाद देऊन प्रत्येकाचे विशेष कौतुक केले. आणि मान्यवर व्यक्तींकडून कौतुक होण्यासारखा सुंदर अनुभव आपल्या स्पर्धकांनी अनुभवला आहे.

‘माऊली’च्या उपस्थितीत रंगलेला हा ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा खास एपिसोड प्रेक्षकांना १० आणि ११ डिसेंबरला रात्री ९ वाजता सोनी मराठी वर पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button