इंस्टाग्राम वर श्रध्दा कपूर बनली नंबर वन

गेले काही दिवस आपली फिल्म ‘स्त्री’च्यामूळे चर्चेत राहिलेली आशिकी गर्ल श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार इंस्टाग्राम वर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. असं पहिल्यांदा झालं असेल की, श्रद्धा ने आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण सारख्या मात्तब्बर अभिनेत्रींना पाठी टाकतं  इंस्टाग्रामवर नंबर वन स्थान पाटकावण्यात यश मिळवलं आहे.
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
इंस्टाग्रामवर श्रद्धा  १०० गुणांसह सर्वश्रेष्ठ बनली आहे. तर अलिया भट्ट  ८५ गुणांसह  दूस-या स्थानावर पोहोचली आहे.  दीपिका पादुकोण ६८ गुणांमूळे तिस-या पदी तर   प्रियंका चोप्रा  ६६ गुणांसह  चौथ्या स्थानावर आहे.  सोनम कपूर अहुजा ५९ गुणांसह  पांचव्या स्थानावर आहे.
स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात की, “एका महिन्याच्या आत सातव्या स्थानावरून सरळ अग्रस्थानी पोहोचलेल्या  श्रद्धाने आपल्या बॉलीवूडमधल्या सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. तिची वाटचाल नक्कीच  उल्लेखनीय म्हणायला हवी. राजकुमार राव सोबतची फिल्म स्त्री आणि शाहिद कपूर सोबतची फिल्म बत्ती गुल मीटर चालू मूळे तिची बरीच पब्लिसिटी होतेय. ह्याच पब्लिसिटीनूसार श्रध्दाच्या इन्स्टा पोस्ट आणि इन्स्टा स्टोरीज असतात. त्यामूळेच तर  श्रध्दाच्या  इंस्टाग्रामच्या  लोकप्रियतेत वाढ झाली आहे. “

अश्वनी कौल पूढे म्हणतात, “श्रध्दा  आपल्या कुटूंबासोबतचे फोटोही  पोस्ट करते.ज्यामूळे तिच्या लोकप्रियतेत वाढ होत असते. 4 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply