Marathi News

अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार मराठमोळी अमृता !

अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार मराठमोळी अमृता !
अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार मराठमोळी अमृता !

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक कलाकार उत्सुक असतो. अशीच संधी मिळाली आहे आपल्या मराठमोळ्या अमृताला. अमिताभ बच्चन हे स्टार प्लसच्या “आज कि रात है जिंदगी” या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर पुरागमन करीत आहेत. याचं कार्यक्रमात आपल्या अमृताचाही सहभाग असणार आहे. आपल्या समाजात अशी काही व्यक्तिमत्व आहेत जी आपल्यासाठी अगदीच साधारण असतील पण त्यांचं कर्तृत्व असामान्य आहे. अशाच काही खास व्यक्तिमत्वांची ओळख आपल्याला “आज कि रात है जिंदगी” या कार्यक्रमातून होणार आहे. अमिताभ बच्चन हे या शोचे होस्ट आहेत हे तर आपल्याला माहिती झालेच आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या अशा काही सुप्त इच्छा असतात, त्या पूर्ण होतील किंवा नाही हे आपल्याला माहितीही नसते. “आज कि रात है जिंदगी” या कार्यक्रमात आपल्याला ओळख करून दिल्या जाणाऱ्या या व्यक्तीमत्वांच्या सुप्त इच्छा पूर्ण केल्या जाणार आहेत. हेमलता या असामान्य मुलीने समाजातील गरजू लोकांसाठी अनेक उपक्रम राबविले, त्यातलीच एक गोष्ट म्हणजेच हेमालाताने अंधांचा ऑर्केस्ट्रा स्थापन करून त्यांची एक वेगळीच ओळख जगाला करून दिली. सुंदर दिसणाऱ्या तसेच उत्तम नृत्य करणाऱ्या अमृता खानविलकरबरोबर एक लावणी करण्याची इच्छा हेमलताने व्यक्त केली आहे. अमृतानेही एका क्षणाचाही विचार न करता हेमालाताची इच्छा पूर्ण करण्यास होकार दिला. त्यामुळेच आपण “आज कि रात है जिंदगी”च्या पहिल्या भागातच अमृताला आणि हेमलताला धमाकेदार लावणी करताना पाहणार आहोत. येत्या १८ तारखेला आपल्याला हा भाग पाहता येणार आहे.

“लोकांना माझ लावणी  नृत्य खूप आवडत, या लावणी नृत्यासाठी मला स्पेशली बोलावलं जात हीच माझ्या कामाची पोचपावती आहे, असचं म्हणेन. हेमलताला माझ्यासोबत लावणी करायची आहे हे ऐकूनच मला खूप छान वाटलं, तिच्यासारख्या असामान्य मुलीला मी माझ्यापरीने कायम सपोर्ट करेन, आपल्या समाजात दुसऱ्यांसाठी करणारी माणसे खूप आहेत. अशा व्यक्तीमत्वांच्या चांगल्या कामाला सपोर्ट करण्याची संधी मिळाली आहे, हे मी माझ भाग्य समजेन., अमिताभ बच्चन यांच्यासोबत मला स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली आहे याचा मला खूप आनंद होतोय”  – अमृता खानविलकर

Related Articles

Leave a Reply

Back to top button