Marathi News

अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Shivani Surve
Shivani Surve

2020 हे वर्ष शिवानी सुर्वेचं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री शिवानी सुर्वेवर 2020च्या सुरूवातीपासून पुरस्कारांची बरसात होत आहे. नुकताच सिटी सिने अवॉर्ड्समध्ये शिवानीला सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाचा हा शिवानीचा चौथा पुरस्कार आहे.

महाराष्ट्राचा फेवरेट कोण ह्या पुरस्कार सोहळ्यात ‘पॉप्युलर फेस ऑफ दि इयर’, आणि ‘महाराष्ट्राची फेवरेट डेब्युटंट अभिनेत्री’ असे दोन पुरस्कार शिवानीला मिळाले होते. त्यापाठोपाठच व्हिएतनाममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिच्या ‘जाना ना दिल से दूर’ ह्या हिंदी मालिकेतल्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आणि आता सिटी सिने अवॉर्ड्समध्ये शिवानीला सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

सूत्रांच्यानूसार, शिवानी सुर्वेच्या करीयरच्या ह्या चढत्या आलेखाने तिला आता सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रीच्या पदी पोहोचवले आहे. बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वामूळे जरी तिला लोकप्रियता मिळाली असली तरीही हा आलेख उंचावत नेण्याचे काम तिच्या अभिनय कारकिर्दीने केलेले आहे. आणि ट्रिपल सीटसाठी मिळालेल्या ह्या पुरस्काराने हेच साबित केले आहे.

सर्वोत्कृष्ट डेब्युटंट अभिनेत्रीचा पुरस्कार स्विकारल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेत्री शिवानी सुर्वे म्हणाली, “ ह्या पुरस्काराचे संपूर्ण श्रेय मी माझ्या चाहत्यांना देऊ इच्छिते. मी फक्त माझ्या ट्रिपल सीटमधल्या भूमिकेवर मेहनत केली होती. पण माझ्या चाहत्यांनी मला सर्वोत्कृष्ट डेब्युंटंट अभिनेत्री बनवण्यासाठी भरघोस मतदान केले नसते. तर आज हा पुरस्कार मला मिळाला नसता. त्यामूळे मी माझ्या चाहत्यांची ऋणी आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button