‘अनान’ च्या निमित्ताने प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा नव्या विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला

anan
मराठी सिनेसृष्टीत बरीच नवी मंडळी नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने प्रवेश करतात. अशाच एका वेगळ्या विषयावरचा सिनेमा रोहन थिएटर्स ही सिनेसंस्था आपल्या भेटीला घेऊन येत आहे. ज्या चित्रपटाचं नाव ‘अनान’ असं असून या सिनेमाचं टीझर पोस्टर डिजीटली लाँच करण्यात आलं. अवघ्या दोन दिवसांत या टीझर पोस्टरला एक लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
या चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच लाँच झालेल्या या पोस्टरवर ‘नटराज’ च्या मूर्तीसमोर उभी असलेली एक जोडी आपल्याला दिसते ज्यात प्रार्थना एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे तर पोस्टरमधील नायक मात्र अद्याप समोर आलेला नाही. या पोस्टरवर स्वर्णाक्षरात लिहिलेलं ‘अनान’ हे चित्रशीर्षक… या शब्दाचा अर्थ काय? आणि या चित्रपटातून नेमकं काय मांडण्याचा प्रयत्न केला आहे? प्रार्थना च्या जोडीला अजून कोणते चेहरे या वेगळ्या विषयाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आणि या चित्रपटातून कोणता नवीन विषय मराठीत प्रवेश करणार या सगळ्या गोष्टींवरून लवकरच पडदा उठणार आहे.
‘अनान’ या चित्रपटातून ‘रोहन थिएटर्स’ चे रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया निर्माते म्हणून मराठीत पदार्पण करत असून या चित्रपटाची कथा हेमंत भाटीया यांची आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कुष्टे यांनी केलं आहे तर पटकथा – संवाद राजेश कुष्टे आणि मुकेश जाधव यांनी लिहिले आहेत. दिग्दर्शनाबरोबरच गीतलेखनाची धुरा ही राजेश कुष्टे यांनी पेलली आहे. चित्रपटाचं संकलन सेजल पेंटर यांनी केलं असून छायाचित्रदिग्दर्शन राज कडूर यांनी केलं आहे. तर चित्रपटाला साजेस संगीत सौरभ-दुर्गेश या संगीतकार जोडीनं दिलं आहे. ‘अनान’ या चित्रपटाच्यानिमित्ताने सौरभ– दुर्गेश ही संगीतकार जोडीही मराठी सिनेसृष्टीला लाभली आहे.

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply