Marathi News

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी ‘मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डने सन्मानित

swapnil joshi

आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीने मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट करून चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. वेगळ्या वाटेवरून यशस्वी प्रवास करणाऱ्या स्वप्नीलचा ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात सन्मान करण्यात आला. चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवणाऱ्या स्वप्नीलचा प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ या सोहळ्यात ‘आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू रिजनल सिनेमा बेस्ट अॅक्टर अवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मुंबईत बुधवारी ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०१९’ हा भव्य सोहळा दिमाखात पार पडला. या अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूड, मराठी आणि बिझिनेस जगतासह विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल स्वप्नील जोशी म्हणाला की, ‘आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू रिजनल सिनेमा बेस्ट अॅक्टर’चा अवार्ड आज मला मिळाला, या पुरस्कार सोहळ्यात मला दुसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे वर्ष असून पहिल्या वर्षी मला ‘यंग अचिवर्स’ म्हणून तर यावर्षी प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ मिळाला असून हिंदीमध्ये हा अवॉर्ड अजय देवगण यांना मिळाला आहे. हा ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ मिळाला याचा मला खूप आनंद आणि आभिमान होत आहे यापुढे ही मी मायबाप रसिक प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करत राहीन.”

याशिवाय स्वप्नील जोशीचा रेडिओवर ‘रेडिओ शो शेअरिट टू स्वप्नील’ हा शो येतोय तो लवकरच श्रोत्यांना २३ डिसेंबरपासून रेडिओवर ऐकायला मिळणार आहे’.

Related Articles

Leave a Reply

Back to top button