Marathi News

स्वप्नील जोशी आणि संदीप पाठक पहिल्यांदाच ‘मोगरा फुलला’मध्ये एकत्र

Sandip Pathak and Swapnil Joshi- Mogra Phulaala-2
Sandip Pathak and Swapnil Joshi- Mogra Phulaala-2

जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या मित्राची भूमिका चतुरस्र अभिनेता संदीप पाठक साकारत आहे. या चित्रपटात तो सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या  भूमिकेत दिसणार आहे. मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या मित्राची भूमिका संदीप पाठक साकारत आहे. हा सुनीलचा खूपच चांगला मित्र आहेअसे हे पात्र आहे. आपण नेहमीच इच्छित असलेल्या कोणत्याही चांगल्या मित्रासारखे या दोघांचे नाते आहे. सॉफ्टवेअरच्या व्यवसायामध्ये या दोन मित्रांची भागीदारी सुद्धा आहे. सुनील कुलकर्णी सारख्या मित्राला मदत करायला हा मित्र नेहमी तयार असतो.    

सोपं काम अवघड करणारे मित्र कठीण असतात… या टॅगलाइनसह नुकतेच एक पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रकाशित केले आहे. त्यात स्वप्नील आणि चित्रपटात त्याचा मित्र बनलेला संदीप पाठक यांचा वेगळाच लुक यामध्ये बघायला मिळत आहे. वेगळ्या गेटअपमधील संदिप पाठक तर या फोटोमध्ये कमालीचा वेगळा दिसत आहे. या दोघांची केमिस्ट्री यातून व्यक्त होत असूनत्यांच्यातील मैत्रीचा पोत त्यातून अधोरेखित होतो.

आपली भूमिका आणि अभिनयाविषयी बोलताना संदीप पाठक म्हणाला की मला अभिनेता म्हणून नेहमी असं वाटतं की चांगल्या कथानकात आपला सहभाग असावाप्रत्येक पात्राला महत्व असलेला सिनेमा करायला मिळावा. उत्तम दिग्दर्शकअनुभवी कलाकारांसोबत काम करता यावंदर्जेदार प्रोजेक्टमधे आपला खारीचा वाटा असावामाझ्या ह्या सगळ्या इच्छा  “मोगरा फुलला” या सिनेमातून पूर्ण होत आहेत हे मी प्रेक्षकांनावाचकांना नककी सांगु शकतो. मला ही संधी श्रावणीताई देवधरस्वप्नील जोशीकार्तिक सर आणि जीसिम्स प्रॉडक्शन्सने दिली’.

संदीप पाठक याने हरिश्चंद्राची फॅक्टरीएक डाव धोबीपछाडशहाणपण देगा देवा आणि एक हजाराची नोट यांसारख्या गाजलेल्या अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. तर फू बाई फूघडलंय बिघडलंयअसंभवएका लग्नाची दुसरी गोष्टअशा अनेक मालिकांतून त्यांनी काम केले आहे. तसेचअसा मी असामीलग्नकल्लोळजादू तेरी नजरज्याचा शेवट गोडसासू माझी धांसू‘ या नाटकांतून अभिनय केला आहे. वऱ्हाड निघालंय लंडनलाया नाटकाच्या एकपात्री प्रयोगातून संदीप पाठक आपल्याला बघायला मिळाले आहेत. या त्यांच्या अभिनयामुळे एक चतुरस्र अभिनेता अशी संदीप पाठक यांची ओळख बनली आहे.

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि संदिप पाठक यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णीसई देवधरनीना कुळकर्णीसुहिता थत्तेसमिधा गुरुविघ्नेश जोशीसंयोगिता भावेदीप्ती भागवतप्राची जोशीसानवी रत्नालीकरआनंद इंगळेआशिष गोखलेप्रसाद लिमयेहर्षा गुप्तेसोनम निशाणदार,सिद्धीरूपा करमरकरमाधुरी भारतीसुप्रीत कदमअनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

जीसिम्सच्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जीसिम्स फिल्म्सने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात फुगेतुला कळणार नाहीरणांगण यासारख्या चित्रपटांचा समावेश आहेस्टार प्रवाह वरील नकळत सारे घडलेया मालिकेची निर्मिती त्याचबरोबर भिकारी’ या चित्रपटची प्रस्तुती देखील जीसिम्सने केली आहे. भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असलेल्या पॅनोरमा स्टुडिओजने मोगरा फुललाच्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे.

प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी मोगरा फुललाच्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडावसरकारनामालेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. मोगरा फुललाला स्वतःचा असा वेगळा टच’ देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button