Home > Marathi News > सलमान खानची ‘भारत’ पहिल्या सहामाहीतली सर्वाधिक लोकप्रिय फिल्म

सलमान खानची ‘भारत’ पहिल्या सहामाहीतली सर्वाधिक लोकप्रिय फिल्म

Top Five popular movies
Top Five popular movies

 

सलमान खानच्या नुकत्याच रिलीज़ झालेल्या फिल्म भारतला तिकीट खिडकीवर चांगला प्रतिसाद मिळाला. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ही फिल्म यंदाच्या सहामाहीतली सर्वाधिक लोकप्रिय फिल्म बनलीय. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आंकड़ेवारीनुसार, भारत चित्रपटाने व्हायरल न्यूज, न्यूजप्रिंट आणि डिजिटल श्रेणींमध्ये सर्वाधिक म्हणजेच 100 गुण मिळवलेत. ज्यामध्ये सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट्सही सामिल आहेत.

भारत सिनेमानंतर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर दूस-या स्थानावर करण जौहरची फिल्म कलंक आहे. ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ठीक-ठाक कमाई केली होती. पण आश्चर्यजनकरित्या 22.78 गुणांसह ही फिल्म चार्टवर दूस-या क्रमांकावर आली आहे. 42.6 गुणांसह कलंकने डिजिटल (सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट)मध्ये जास्त स्कोर केला आहे. तर न्यूज प्रिंटमध्ये 22.56 आणि व्हायरल न्यूज श्रेणीत 10.09 गुण मिळवले आहेत.

विकी कौशलची ब्लॉकबस्टर फिल्म स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर तिस-या क्रमांकावर आहे. सर्जिकल स्ट्राइकवर असलेल्या ह्या चित्रपटाने सर्व कॅटॅगरीत एकत्रितपणे 22.35 गुण मिळवले आहेत. उरीने 40.30 गुणांसह डिजिटल आणि 28.66 गुणांसह न्यूज प्रिंटमध्ये चांगला स्कोर केला आहे.

महानायक अमिताभ बच्चनची फिल्म ‘बदला’ सर्व श्रेणींमध्ये 17.53 गुणांसह चार्टवर चौथ्या स्थानी आहे. तर, अक्षय कुमारची फिल्म केसरी एकुण 16.18 गुणांसह पांचव्या क्रमांकावर आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “सलमान खान बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचा ‘अनडिस्प्युटेड सुपरस्टार’ आहे. आणि त्याचे सिनेमे चार्ट्सवर नेहमीच नेतृत्व करताना दिसतात. मात्र आश्चर्यजनकरित्या मणिकर्णिका सारखी फिल्म सहाव्या क्रमांकावर, ‘ठाकरे’ सातव्या क्रमांकावर, ‘गली बॉय’ आठव्या क्रमांकावर आणि ‘टोटल धमाल’ नवव्या क्रमांकावर आहे. “

अश्वनी पूढे सांगतात, “यंदाच्या दूस-या सहामाहीची सुरूवात ‘कबीर सिंह’ सिनेमाने उत्तम करून दिलीय. स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर सध्या ही फिल्म दहाव्या क्रमांकावर आहे. आणि लवकरच वर्षाच्या रँकिंगमध्ये ही फिल्म बाकी चित्रपटांना मागे टाकत पूढे जाईल, असे अनुमान आहे. “

अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

About justmarathi

Check Also

Smile Please review

Smile Please Marathi Movie Review

Catch the Roller Coaster Emotional Ride with perfect action and performances Movie – Smile Please …

Leave a Reply