Marathi News

जाहिरात विश्वात रणवीर- दीपिकाची जोडी सर्वाधिक लोकप्रिय

बॉलीवुडची सर्वात लोकप्रिय जोडी आता जाहिरात विश्वातलीही सर्वाधिक लोकप्रिय जोडी बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सच्यानुसार,सेलिब्रिटी कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण टेलिव्हिजन कमर्शिअल्स म्हणजेच TVC जगतातले लोकप्रिय कपल बनले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हे स्पष्ट होते आहे की,  जाहिरात विश्वातल्या लोकप्रिय जोड्यांमध्ये रणवीर-दीपिका नंबर १ तर वरूण-आलिया नंबर २ स्थानी आहेत. 
 
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. रणवीर आणि दीपिका सध्या LLYODS AC कमर्शियलमध्ये दिसत आहेत. लोकप्रियतेच्या  चार्टवर  १०० गुणांसह सध्या ते पहिल्या स्थानी आहेत.तर, वरुण आणि आलिया ही जोड़ी प्रसिद्ध फ्रूटी अ‍ॅड कॅम्पेनमध्ये दिसून येत आहे. ही जोडी ८६.०२ गुणांसह दुस-या स्थानी आहे. 
 
गली बॉय फिल्मची सुप्रसिध्द जोडी रणवीर – आलियाने  बॉक्स ऑफिसच्या अगोदर अ‍ॅड वल्डवर आपली जादू केली होती.   मेक माय ट्रिपच्या सर्व अ‍ॅड्समध्ये दिसणा-या रणवीर-आलियाची केमिस्ट्री गेले कित्येक महिने जाहिरात विश्वात चर्चेचा विषय आहे. ४८.७८ गुणांसह ह्या जोडीने तिसरे स्थान पटकावले आहे. तर, रणबीर-दीपिका जोडीने नुकतीच  एशियन पेंट्सची जाहिरात केली.  १६.६६ गुणांसह ही जोडी चौथ्या क्रमांकावर आहे. 
 
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक, अश्वनी कौल,  सांगतात, “रणवीर -दीपिका जोडीने लागोपाठ तीन सुपरहिट चित्रपट दिले. त्यानंतर त्यांनी लग्न केले. बॉलीवुडमधले हे कपल सध्याचे सर्वाधिक चर्चित कपल आहे. त्यांची खूप मोठी फॅन फॉलोविंगही आहे. तसेच वरुण आणि आलियाने चार सिनेमे एकत्र केलेत. तसेच काही अ‍ॅड कॅम्पेनमध्येही एकत्र दिसलेत.गेल्या ६ वर्षांपासून ही बॉलीवूडची फेवरेट जोडी आहे.  वरूण-आलियाचा तरूण पिढीमध्ये चाहतावर्गही खूप आहे. ”
 
अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button