Marathi News

‘राजश्री’ची नवीन मराठी वेबसिरीज ‘यु टूर्न’

Marathi web series U turn

प्रेम म्हणजे समजली तर भावना ठेवला तर विश्वास मांडला तर खेळ आणि निभावलं तर वचन…….
याच प्रेमाची एक नवीन ओळख करून द्यायला लवकरच येत आहे राजश्री मराठीची एक नवीन वेबसिरीज ‘यु टर्न’. ‘यु टर्न’ म्हटले की पटकन डोळ्यांसमोर येतो गाडीतून फिरताना मारला जाणारा ‘यु टर्न’. थांबा. हा ‘यु टर्न’ मात्र जरा वेगळा आहे.  आता ‘यु टर्न’ नक्की कोणता? कोणाचा? कशासाठी? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला ही वेबसिरिज पाहिल्यावरच मिळणार आहे. या वेबसिरीजमध्ये अनेक गाजलेल्या मालिकांमधून दिसणारे दोन चेहरे आपल्याला दिसणार आहेत. ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव ही नवीकोरी जोडी आपल्याला या वेबसिरीजच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. तूर्तास या वेबसिरीजचा एक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. तीस सेकंदाच्या या व्हिडिओत ओमप्रकाश आणि सायली दिसत असून दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसत आहेत. या वेबसिरीजमध्ये काय पाहायला मिळणार यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे.
 या वेबसिरीजचे अजून एक वैशिट्य म्हणजे अनेकविध भाषांमध्ये चित्रपट, मालिकांची निर्मिती करणारे राजश्री मराठी या वेबसिरीजच्या रूपाने मराठी वेब विश्वात पदार्पण करत आहे. अनेक दर्जेदार कलाकृतींनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे राजश्री मराठी या क्षेत्रातही आपला ठसा उमटवणार वाद नाही. नेहा बडजात्या यांची निर्मिती असलेली ‘यु टर्न’ ही वेबसिरीज मयुरेश जोशी यांनी दिग्दर्शित केली आहे. तसेच या वेबसिरीजचे लेखन, संगीत आणि गीते देखील मयुरेश जोशी यांनीच केली आहेत.  तर मग तयार राहा या मान्सून मध्ये प्रेमाच्या पावसात चिंब होण्यासाठी.

Related Articles

Leave a Reply

Back to top button