माधव देवचकेला बिग बॉस मराठी जिंकण्यासाठी क्रिकेटर सलील अंकोला आणि राखी सावंतने दिल्या शुभेच्छा

Madhav Deochake And Rakhi Sawant
Madhav Deochake And Rakhi Sawant

 

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातला स्ट्राँग कंटेस्टंट माधव देवचकेला अभिनेत्री राखी सावंतने शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस हा रिएलिटी शो भारतात 2006ला सुरू झाला. बिग बॉस हिंदी च्या 2006च्या सर्वात पहिल्या पर्वात अभिनेत्री राखी सावंत  आणि क्रिकेटर सलील अंकोला कंटेस्टंट होते. राखी तर टॉप-5 पर्यंत ह्या शोमध्ये राहिली होती. आता बिग बॉसमध्ये तशाच पध्दतीने माधवही टिकुन राहावा म्हणून राखीने शुभेच्छा दिल्या आहेत.

राखी सावंत म्हणते, “माधव खुप चांगला माणुस आहे. तो खुप चांगला कलाकार आहे. त्यामुळे त्याला भरघोस मत द्या. आणि माधव तुला बिग बॉसच्या घरातून बाहेर यायचं नाही आहे. तू जिंकुनच ये. माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा. ”

माधव चांगला अभिनेता असण्याशिवाय तो उत्तम क्रिकेटर आहे. त्यामुळेच क्रिकेटर सलील अंकोला यांच्यासोबत माधवची मैत्री आहे. आपला मित्र माधवला सगळ्यांनी व्होट करावे म्हणून सलील अंकोला ह्यांनीही प्रेक्षकांना आवाहन केले आहे. सलील अंकोला म्हणाले, “माझा प्रिय मित्र माधव खूप चांगला माणूस आहे. तो खुप चांगला खेळतोय. तो एक स्टाँग कंटेस्टंट आहे. तो खूप एन्टरटेनिंगही आहे. त्याला भरभरून मत द्या. ज्यामुळे तो बिग बॉसमध्ये टिकून राहिल आणि आपले असेच मनोरंजन करत राहिल.”

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply