२७ मेपासून होणार ‘कोण होणार करोडपती?’ ची सुरूवात
२७ मेपासून होणार ‘कोण होणार करोडपती?’ ची सुरूवात – सोमवार ते गुरूवार रात्री ८.३० वाजता
आपल्या ज्ञानाच्या जोरावर सारं काही शक्य आहे, हे पटवून देणारा मंच म्हणजे कोण होणार करोडपती? या मंचाचं सोनी मराठीवर नव्याने आगमन होत आहे. येत्या २७ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीलायेणाऱ्या या मंचाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा स्वप्नपूर्तीची वाट खुली होणार आहे. सोमवार ते गुरूवार हा कार्यक्रम प्रेक्षक पाहू शकणार आहेत. सोमवार ते बुधवार प्रेक्षकवर्ग आपल्या ज्ञानाच्या जोरावरहॉटसीट पटकवणार आहेत तर गुरूवारी काही खास पाहुण्यांबरोबर एपिसोड पाहायला मिळणार आहे.
दरम्यान नागराज मंजुळे या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या ज्ञानाची तिजोरी उघडून हॉटसीटवर बसणाऱ्या सामान्यांमधला हिरो नागराज प्रेक्षकांसमोर आणणार आहेत .तेव्हा ज्ञानाच्या जोरावर हॉटसीट गाठणाऱ्या हिरोज् ची भेट नक्की घ्या २७ मेपासून सोमवार ते गुरूवार रात्री ८.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.
English: KHC show is coming soon on Sony Marathi on 27th May at 8:30 PM Monday to Thursday.