करण जोहर बनला 2019चा सर्वाधिक लोकप्रिय भारतीय फिल्ममेकर !

 

फिल्ममेकर करण जोहर बॉलीवूडच्या लोकप्रिय फिल्ममेकर्सच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने  गेल्या सहामाहीत बॉलीवूडमधले सर्वाधिक लोकप्रिय फिल्ममेकर्सची नुकतीच एक लिस्ट काढली आहे. ह्या लिस्टनूसार, करण जोहर लोकप्रियतेत अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे

ह्या लिस्टनूसार, करण जोहर पहिल्या क्रमांकावर तर फिल्म 2.0’ चा दिग्दर्शक शंकर दूस-या स्थानी, फरहान अख्तर तिस-या क्रमांकावर, रोहित शेट्टी चौथ्या स्थानी आणि अनुराग कश्यप पाचव्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

सिंबा, केसरी, कलंक आणि स्टुडंट ऑफ दि इयर-2 ह्या फिल्म्सच्यामूळे करण जोहर बॉलीवूडच्या फिल्ममेकर्समध्ये सर्वाधिक चर्चेत राहिले. तसेच, त्यांचा कॉफ़ी विथ करण सीजन 6 ही लोकप्रिय शो होता. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्यानूसारव्हायरल न्यूजन्यूजप्रिंट, डिजिटल, सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट्स अशा लोकप्रियतेच्या सर्व श्रेणींमध्ये करण100 गुणांसह पहिल्या पदावर आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले लोकप्रिय फिल्ममेकर शंकर 89.15 गुणांसह लोकप्रियतेत दुस-या स्थानावर आहेत. रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर 2.0 चे दिग्दर्शक शंकर ह्यांना डिजीटल श्रेणीमध्ये 93.07 गुण, व्हायरल न्यूज श्रेणीमध्ये 17 गुण आणि न्यूजप्रिंट श्रेणीमध्ये 100 गुणांसह लोकप्रियतेत दुसरे पद मिळाले आहे.

लोकप्रियतेत फिल्ममेकर फरहान अख्तर तिस-या क्रमांकावर आहे. आपली फिल्म गली बॉय आणि वेबसीरिज मेड इन हेवनची लोकप्रियता तसेच, मॉडेल शिवानी दांडेकरसोबतच्या डेटिंगच्या न्यूजमूळे फरहान अख्तरला लोकप्रियतेत तिसरे स्थान मिळाले आहे.

फिल्ममेकर आणि टेलीव्हिजनचा लोकप्रिय होस्ट रोहित शेट्टी 30.24 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आपली ब्लॉकबस्टर फिल्म सिंबा आणि खतरों के खिलाडी ह्या रिएलिटी शोच्या सर्वाधिक टीआरपीमूळे रोहित शेट्टी चौथ्या पदावर आहे. तसेच गेल्या महिन्यापासून सुर्यवंशी सिनेमाविषयी मीडियामध्ये छापून येत असलेल्या न्यूजमूळेही रोहित शेट्टी सतत चर्चेत राहिला आहे.

नेटफ्लिक्सची सर्वाधिक लोकप्रिय वेबमालिका सॅक्रेड गेम्सचा निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या ह्या वेबसीरिजच्या दूस-या पर्वाविषयी सध्या प्रेक्षकांच्या वाढलेल्या उत्कंठेमूळे सतत चर्चेत राहिला आहे. तसेच हृतिक रोशन स्टारर सुपर 30’चा ही तो निर्माता आहे. ह्या सिनेमाच्या सातत्याने होत असलेल्या कॉन्ट्रोवर्सीमूळे आणि सोशल मीडियावर आपल्या बेधडक विधानांमूळे अनुराग मीडियाच्या मथळ्यांमध्ये यंदा सातत्याने राहिला आहे. तसेच अनुराग कश्यपची नुकतीच रिलीज झालेली फिल्म गेम ओवरसुध्दा अनुरागला प्रकाशझोतात ठेवायला कारणीभूत ठरली.  

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल ह्याविषयी सांगतात, “करण जोहर आता एक ब्रँड झाला आहे. फक्त आपल्या सिनेमांमूळेच नाही तर आपल्या सामाजिक जीवनामधल्या वावरामूळेही करण जोहरची चांगलीच फॅनफॉलोविंग आहे. मग ते करणचे डुडल्स असोत की एअरपोर्ट लुक्स..  करण जवळजवळ रोजच कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्र किंवा फॅशनकॉलम्सचा हिस्सा असतो. करणचा चाहतावर्ग मासेस आणि क्लासेस दोन्हीमध्ये आहे. म्हणूनच की काय, तो असा एकुलता एक फिल्ममेकर आहे, ज्याची फॅन फॉलोविंग एखाद्या बॉलीवूड एक्टरला लाजवेल एवढी आहे.

अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply