Marathi News

Hrudayat Something Something : हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा !

हृदयात समथिंग समथिंगप्रविण राजा कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा ट्रेलर मुंबईत एका शानदार सोहळ्यात नुकताच लाँच करण्यात आला. ह्यावेळी सिनेमाचे कलाकार अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्यासह सिनेमाची म्युझिक  टिमही उपस्थित होती.
 
ह्यावेळी सिनेमाचे निर्माते विनोदकुमार जैन म्हणाले, “माझी ही पहिली निर्मिती आहे. सिनेमा बनवण्याचे स्वप्न मी कित्येक वर्षांपासून पाहत होतो. एक निखळ मनोरंजन करणा-या कौटुंबिक विनोदी सिनेमाची निर्मिती करावी असं वाटतं होतं. मग मी आणि शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, अतुल गुगळे ह्या माझ्या तीन मित्रांनी मिळून हृदयात समथिंग समथिंग  सिनेमाची निर्मिती केली. आता ह्या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांना मिळणा-या प्रतिसादावरून आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्यासारखे वाटते आहे.”
 
सिनेमाचे लेखक अनिल मधुसूदन कालेलकर म्हणाले, ” आजपर्यंत मी ३१ मालिका आणि २९ चित्रपट लिहिले. हृदयात समथिंग समथिंग हा माझा २९वा चित्रपट म्हणजेच ६०वी कलाकृती. वयाची साठी गाठणे जसे कौतुकाने साजरी करतात. तसाच हा माझ्या साठाव्या कलाकृतीचा कौतुक सोहळा आहे.”
 
दिग्दर्शक प्रविण राजा कारळे म्हणतात, “अशोकमामांसोबत काम करण्याचे माझे स्वप्न हृदयात समथिंग समथिंग सिनेमामूळे पूर्ण झाले. प्रेमात पडल्यानंतरच्या धमाल गंमती-जंमतीना अशोकमामांच्या कॉमिक टाइमिंगमूळे रंगायला खूप मदद झाली. आणि सिनेमा खूप मनोरंजक झाला आहे. “
 
अशोक सराफ म्हणतात, “चांगली कथा, उत्तम दिग्दर्शन आणि कसलेले कलाकार ह्यामूळे कोणत्याही धाटणीचा सिनेमा मनोरंजक होत जातो. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला हा सिनेमा आपल्या हृदयाजवळचा वाटेल, असा मला विश्वास वाटतो. “
 
पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत विनोदकुमार जैनशैलेंद्र पारखस्वप्नील चव्हाणआणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला प्रवीण राजा कारळे दिग्दर्शितअनिकेत विश्वासरावस्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदया समथिंग समथिंग’ चित्रपट ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button