Marathi News

सोनी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार शाही नथ जिंकण्याची संधी

स्वराज्याचं स्वप्न उरी बाळगणाऱ्या जिजाच्या बालपणापासून सुरू झालेली स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका! या मालिकेने जिजाबाईंच्या आयुष्यातले कित्येक महत्त्वपूर्ण टप्पे प्रेक्षकांसमोर मांडले. जिजाबाई लखुजी जाधव ते जिजाबाई शहाजी भोसले हा प्रवास आपण पाहिला. त्यांचं स्वराज्याचं स्वप्न, अन्यायाविरोधातील चीड या सगळ्या गोष्टी मालिकेत मांडल्या गेल्या आहेत. या माऊलीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण लवकरच मालिकेत दाखवला जाणार आहे. हा क्षण आहे शिवरायांच्या जन्माचा. शिवनेरी गडावर या मुलखावेगळ्या आईच्या पोटी शिवबा जन्मला. इतिहासातला हा सुवर्णक्षण!

               या सोन्यासारख्या क्षणाचा सोहळा सोनी मराठी पु. ना. गाडगीळ यांच्या साथीने साजरा करत आहे ज्यांनी स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेसाठी खास दागिने तयार केले आहेत तसेच लहानग्या शिवबा साठी देखील पु. ना. गाडगीळ यांनी खास दागिने तयार केले आहेत. तुम्हीही या ‘शाही नथीचा नजराणा’ प्रश्नमंजुषेत सहभागी होऊन जिंकू शकता पु. ना. गाडगीळ यांनी खास या प्रश्नमंजुषेसाठी तयार केलेली सोन्याची नथ आणि ठुशी. शिवजन्मानिमित्त आयोजित ‘शाही नथीचा नजराणा’ या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी sonymarathi.com वर लॉग इन करून रात्री ८.३० वाजता, स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत. या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या स्पर्धकांपैकी एका भाग्यवान विजेत्याचं नाव दुसऱ्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या भागातून जाहीर केलं जाणार आहे. ८ ते १९ फेब्रुवारीदरम्यान दररोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या प्रेक्षकांमधून एक विजेता ठरणार असून त्याला भेट दिली जाणार आहे पु. ना. गाडगीळ यांनी खास तयार केलेली शाही नथ तर एका महाविजेत्याला मिळणार आहे पु. ना. गाडगीळ यांच्या ठुशीचा मान!

               तेव्हा ८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी sonymarathi.com वर लॉग इन करा आणि ‘शाही नथीचा नजराणा’ प्रश्नमंजूषेत सहभागी व्हा. यासाठी पाहत राहा स्वराज्यजननी जिजामाता सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Related Articles

Leave a Reply

Back to top button