Marathi News

Fwd: ‘मिर्जापुर’ आणि ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ च्यामूळे अली फजल-कीर्ति कुलहारी झाले सर्वाधिक लोकप्रिय स्टार्स !!

Top Actress in Web Series

 

टेलिव्हिजन आणि रूपेरी पडद्यानंतर सध्या वेब सीरीजचे जग सर्वाधिक लोकप्रिय झालेले आहे. त्यामूळेच तर वेबसीरिजमधल्या कलाकारांची फॅन फॉलोविंगही खूप जास्त वाढत आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, गेल्या आठवड्यात ‘मिर्जापुर’चा अभिनेता अली फजल आणि ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ फेम अभिनेत्री कीर्ति कुलहारी वेबसीरिजच्या दुनियेतल्या कलाकारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

वेब सीरिजच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये कीर्ति कुलहारीने अमेज़ॉन प्राइमच्या ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ह्या मालिकेत दिलेल्या आपल्या बोल्ड परफॉर्मन्समूळे नंबर वन स्थान पटकावले. इतके दिवस वेबसीरिज स्टार्सच्या लोकप्रियतेत नंबर वन स्थानी असलेल्या राधिका आपटेला कीर्तिने 94 गुणांसह नंबर स्थानी येऊन मागे टाकले. नेटफ्लिक्सच्या ‘सॅक्रेड गेम्स’ आणि ‘घोल’ मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री राधिका आपटे सध्या लोकप्रियतेत 46 गुणांसह दूस-या स्थानावर आहे. ‘बीएफएफ विथ वोग’ सीजन 2(वूट) ने नेहा धूपियाला तिस-या स्थानावर नेऊन ठेवले. तर ‘इट्स नॉट दॅट सिंपल’ (वूट) आणि रसभरी ह्या वेबमालिकांमूळे स्वरा भास्कर चौथ्या पदावर पोहोचली. ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ची अभिनेत्री लीजा रे पांचव्या स्थानावर आहे.

लोकप्रिय अभिनेत्यांच्या श्रेणीमध्ये अमेज़ॉनच्या ‘मिर्जापुर’मध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा अभिनेता अली फ़जल लोकप्रियतेत प्रथम स्थानी आहे. 79 गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या अली ने ऑल्ट बालाजीच्या ‘कहने को हमसफर हैं’ वेबसीरिजचा अभिनेता रोनित रॉयला लोकप्रियतेत मागे टाकलंय. रोनित 48 गुणांसह दूस-या स्थानावर आहे,‘सॅक्रेड गेम्स’चे दोन्ही लोकप्रिय अभिनेते सैफ अली खान और नवाजुद्दीन सिद्दिकी ह्या यादीत तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहेत. तर ‘मिर्जापुर’मूळे अभिनेता पंकज त्रिपाठीच्या लोकप्रियतेत वाढ होऊन ते पांचव्या स्थानावर आहेत.

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कीर्ति आणि अलीची लोकप्रियता डिजिटल न्यूज, न्यूजपेपर आणि वायरल न्यूजमध्ये दिसून आली होती.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल ह्याविषयी सांगतात, “वेब सीरीज़च्या अभिनेत्यांची वाढती लोकप्रियता जेव्हा आम्ही बारकाईने पाहू लागलो. तेव्हा आम्हांला असं लक्षात आलं की, आज बॉलीवूड स्टार्सप्रमाणेच ह्या वेबमालिकांमध्ये काम करणा-या अभिनेत्यांची लोकप्रियता आहे. सोशल प्लेटफॉर्म, वायरल न्यूज़, डिजिटल न्यूज़ आणि न्यूज़पेपर्स मध्ये त्यांचा वाढता प्रेजेंस ते स्टार्स झाल्याचाच पूरावा आहे. भले ही मेनस्ट्रीम सिनेमामध्ये ह्यातले काही कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसून येत नसले तरीही वेबसीरिजच्या जगातले ते तारे-तारका आहेत.”

अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button