Marathi News

अनुजा ठरली ‘दादा एक गुड न्युज आहे’ ची पहिली प्रेक्षक

Dada Ek Good News Aahe Marathiबहीण भावाच्या नि: स्वार्थ नात्याची हळवी गोष्ट ‘दादा, एक गुड न्युज आहे’ ह्या नाटकातून  लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ह्याच नाटकाच्या संदर्भात नाटकाच्या टीमने एक स्पर्धा घेऊन नाटकाशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्याला नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे तिकीट भेट म्हणून देण्यात येणार होते.

ह्याच स्पर्धेच्या विजेत्याचं नाव आता  जाहीर करण्यात आले आहे. अनुजा चव्हाण ही ह्या स्पर्धेची भाग्यशाली विजेता ठरली असून ह्या नाटकाची ती पहिली प्रेक्षक देखील ठरली आहे. अनुजा ही ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजची विद्यार्थीनी आहे. अनुजाला दादा, एक गुड न्युज आहे या नाटकाचे तिकीट ह्या नाटकातील कलाकार दस्तुरखुद्द उमेश कामात,  ऋता दुर्गुळे, दिग्दर्शक अद्वैत दादरकर, लेखिका कल्याणी पाठारे आणि ह्या नाटकाची सादरकर्ती प्रिया बापट ह्यांच्या हस्ते देण्यात आले. प्रिया बापट सादर करीत आहे  सोनल प्रोडक्शन निर्मित आणि  कल्याणी पाठारे लिखित ह्या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर ह्यांनी केली असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये ह्यांनी सांभाळले आहे. शिवाय आरती मोरे, ऋषी मनोहर ह्या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button