वेळेच्या नियोजनातही भाऊ ‘नशीबवान’

Nashibvaan Marathi Poster
येत्या ११ जानेवारी ला भाऊ कदम यांचा बहू प्रतिक्षीत ‘नशीबवान‘ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात भाऊ कदम एका सफाई कामगारांच्या भूमिकेत दिसणार आहे. ह्या सिनेमात एका बी.एम.सी.  सफाई कामगाराच्या आयुष्यात अचानक एक घटना घडते आणि त्यातून त्याचे आयुष्य कसे बदलते आणि तो हा बदल कसा स्विकारतो. हे पाहायला मिळणार आहे.  हा संपूर्ण सिनेमा मुंबईतील मुलूंड मध्ये चित्रित करण्यात आला आहे. सिनेमाचे चित्रीकरण सुरु झाले तेव्हा भाऊ कदम हे सोमवार, मंगळवार एका वाहिनीवरील कार्यक्रमच्या चित्रीकरणासाठी वेळ देत होते. तर, शनिवार, रविवार नाटकासाठी वेळ राखलेला होता. यात उरले फक्त तीन दिवस म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार मग याच तीन दिवसात भाऊंनी या चित्रपटाच्या शूटिंगला वेळ दिला.
या सर्व व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना ‘नशीबवान’ च्या शूटिंग साठी तीनच दिवस देता येत होते. म्हणून  या तीन दिवसांमध्ये भाऊ सिनेमासाठी झोकून देऊन काम करत होते. तीन दिवसात भाऊ पूर्ण आठवड्याचे त्याचे चित्रीकरण पूर्ण करत होते. जेणेकरून त्याच्या बिझी वेळापत्रकामुळे चित्रपटाचे काम कुठेही थांबू नये, सहकलाकारांना आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला याचा त्रास होऊ नये. भाऊंच्या कामाबद्दल असणाऱ्या प्रेमापोटी, कामाबद्दल असणाऱ्या समर्पणामुळेच भाऊंनी हे  सर्व अशक्य असणारे, अशक्य वाटणारे शक्य करून दाखवले. 
“ज्यावेळी या व्यक्तिरेखेचा विचार करण्यात आला, त्यावेळी सर्वात प्रथम माझ्यासमोर भाऊ कदम आले. त्यांच्याशिवाय दुसरं कोणी या भूमिकेला योग्य न्याय देऊच शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वेळेनुसार हा चित्रपट करण्याचे मी ठरवले. या चित्रपटासोबतच भाऊंच्या दुसऱ्या अनेक कमिटमेंट होत्या परंतु तरीही त्यांनी त्यांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत हा चित्रपट पूर्ण केला. भाऊंच्या इतर कमिटमेंट्सचा मी आणि आमच्या टीमने पूर्ण आदर राखला आणि भाऊंनी सुद्धा या चित्रपटाच्या शूटिंगला योग्य वेळ देत त्यांचा शब्द पाळला.” असे चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल वसंत गोळे यांनी सांगितले.
 ‘नशीबवान’ ह्या चित्रपटाची निर्मिती  फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी यांनी केली असून  हा चित्रपट उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारीत आहे. लॅंडमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची  प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे  दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले असून, सिनेमाचे  निर्माते अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे आहेत. सोबतच प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात भाऊ कदम यांच्यासह मिताली जगताप–वराडकर, नेहा जोशी, राजेश शृंगारपुरे, अतुल आगलावे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘नशीबवान’च्या निमित्ताने प्रेक्षकांना नवीन वर्षात एक कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट पाहायला मिळणार आहे. 

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply