Marathi News

संजय दत्त निर्मित ‘बाबा’ चित्रपटात बालकलाकार आर्यन मेंघजी दिसणार वेगळ्या भूमिकेत

baba marathi movie poster

 

संजय दत्त प्रॉडक्शन्स’ व ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सनिर्मित आणि राज आर गुप्ता दिग्दर्शित बाबा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असतानाच या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबरच बालकलाकार आर्यन मेंघजी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक अशा भूमिकांसाठी प्रत्येक कलाकार हा खूप मेहनत घेत असतो. बालकलाकार आर्यन मेंघजीही त्याला अपवाद नाही. तो ‘बाबा’ चित्रपटात प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. त्याच्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक होती, ती त्याने पडद्यावर त्याच ताकदीने साकारली आहे. बाबा’ चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आगळ्या अशा कथेवर बेतलेलापण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तसेच भावनेला भाषा नसते’, हा सरळसाधा संदेश बाबाचित्रपटातून देण्यात आला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणात चित्रित झालेला हा चित्रपट पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.

आघाडीच्या  कलाकारांबरोबर काम करताना आर्यननेही स्वतःची प्रतिभा सिद्ध केली आहे. तो म्हणतो की या चित्रपटाबद्दल त्याला खूप उत्कंठा लागून राहिली आहे. या चित्रपटाबद्दलच्या तयारीबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘बाबा‘ मध्ये काम करताना मला खुप मज्जा आली. मी यामध्ये शंकर नावाचं पात्र साकारलं आहे. मी या सिनेमामध्ये दीपक सरनंदिता पाटकरअभिजीत सरजयवंत वाडकर यांच्याबरोबर काम केले आहे आणि राज आर गुप्ता यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील माझी भूमिका खूपच आव्हानात्मक होती. ती साकारताना मला खूप मजा आली’.

तो पुढे म्हणाला की या चित्रपटासाठी काम सुरु करण्याआधी मी १५ ऑगस्ट’ केला. तो डिजिटली प्रदर्शित झाला होता. मोठ्या पडद्यावर प्रत्यक्ष प्रदर्शित होणारा बाबा’ हा माझा पहिला चित्रपट असून त्याचमुळे या चित्रपटाबद्दल मला खूप उत्सुकता आहे.

अवघ्या नऊ वर्षांच्या आर्यनने गणपती बाप्पा मोरयाकुलस्वामिनी या मराठी आणि अशा अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.स्वराज्यरक्षक संभाजी’ या सध्या गाजत असलेल्या मराठी ऐतिहासिक मराठी मालिकेमध्ये त्याने छोट्या राजाराम राजेंची भूमिका केली आहे. १५ ऑगस्ट’ चित्रपटातील त्याची भुमिका खूप गाजली. 

 

बाबामध्ये तनु वेडस मनू’ आणि हिंदी मिडीयम’ फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भुमिका आहे. तो या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्याबरोबर नंदिता पाटकर प्रमुख भूमिकेत आहे. त्यांना स्पृहा जोशीअभिजित खांडकेकरचित्तरंजन गिरी,जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. याआधी त्यांनी धागा’ या झी5 वर प्रदर्शित झालेल्या मराठी लघुपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची कथा मनिष सिंग यांची असून या चित्रपटाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे.

चित्रपटाची सहनिर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्सबरोबर ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सच्या अशोक आणि आरती सुभेदार यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझर आणि पोस्टरला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद लाभतो आहे. अडगुलं मडगुलं‘ या गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या पहिल्या गाण्यालाही रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी आणि इतर भाषेतील चित्रपटसृष्टींमध्येही चित्रपटाचा बोलबाला आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर दस्तुरखुद्द संजय दत्तने चित्रपटातील सर्व अभिनेते आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत नुकताच प्रकाशित केला. या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढवली आहे कारण चित्रपटात अनेक चकित करणारे टप्पे असल्याचा अंदाज बाबाचा हा ट्रेलर देतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button