Marathi News

एक होती राजकुमारी मधून जयडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला

120e5c53 8ba6 461d 8b68 3d36127078b6 1

जयडी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी किरण ढाणे आता सोनी मराठीवरील नव्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच लाँच झालाअसून यापूर्वी नकारात्मक भूमिका साकारणारी किरण आता डॅशिंग महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

लाँच झालेल्या प्रोमोमध्ये या राजकन्येचे बाबा आपली मुलगी कसं आयुष्य जगेल याचं कवितारूपी मनोगत स्पष्ट करताना दिसतात मात्र त्याच्या अगदी विरूध्द या राजकन्येचं खरं आयुष्य आहे. काहीकारणास्तव अवघडलेलं आयुष्य आणि त्याच्याशी दोन हात करत आपलं आयुष्य जगणारी ही राजकन्या. नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या ह्रदयात आपलं स्थान निर्माण करणारी जयडी म्हणजेचअभिनेत्री किरण ढाणे या राजकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे तर तिच्या बाबांची भूमिका किशोर कदम म्हणजेच कवि सौमित्र यांनी साकारली आहे. उत्कृष्ट अभिनेत्यांची ही अदाकारी लवकरच सोनीमराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याबाबत विचारले असता, ‘यापूर्वी खलनायकी भूमिका केल्यानंतर तशाच भूमिकांसाठी अनेक ऑफर्स आल्या. मात्र, मला एका चौकटीत अडकायचं नव्हतं. ‘एक होती राजकन्या’च्या निमित्तानं, एका खंबीरमुलीची भूमिका मला साकारायला मिळतेय. खाकी वर्दीत असणारी ही अवनी जयडीसारखीच प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा असल्याचं, तिने स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button