२५ आणि २६ नोव्हेंबरला पार पडणार महाराष्ट्राची हास्यजत्राचा महाअंतिम सोहळा
सध्याच्या काळात आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं झालं आहे की त्यातून थोडा विरंगुळा म्हणून हास्याचा डोस हा अनिवार्य आहे. सोनी मराठी महाराष्ट्राची हास्यजत्राच्या नव्या हंगामाच्या निमित्ताने सोमवार ते गुरूवार हाच हास्याचा डोस घेऊन येते. हास्यविश्वाची सैर घडवून हास्याचा डोस पाजणाऱ्या महाराष्ट्राची हास्यजत्राचा नवा हंगाम आता त्याच्या अंतिम टप्प्यात आहे. हा महाअंतिम सोहळा 25 नोव्हेंबरला पार पडणार असून आपल्याला हास्यजत्रेच्या या नव्या हंगामातील विजयी जोडी कोण असेल हे पाहायला मजा येणार आहे.
सोमवार ते गुरुवार प्रक्षेपित होणाऱ्या या कॉमेडी रिऍलिटी शोच्या अंतिम फेरीत या हंगामाचे जजेस् ही विनोद करताना आपल्याला दिसणार आहेत. हास्यजत्रेचा भाग होऊन ‘मी रडणं विसरले की काय?’अशी शंका आलेली ड्रामा क्वीन अलका कुबल तर मकरंद अनासपुरेंचा गावठी ठेचा प्रेक्षक स्कीटमधून अनुभवू शकणार आहेत. सोमवार आणि मंगळवारी पाहायला मिळणाऱ्या हास्यजत्रेच्या नव्या हंगामाची सांगता होणार असली तरी हास्याचे स्फोट प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर सोबत बुधवार आणि गुरूवारी कायम असणार आहेत. सोमवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीचं वैशिष्ट्य म्हणजे लफडा सदन, गोलमाल, षड्यंत्रसारख्या नाटकांचे दिग्दर्शक आणि निर्माते असलेल्या व नाट्यसृष्टीत रमणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. त्यासाठीच अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले या अंतिम फेरीत सहभागी झाले आहेत.
तेव्हा विनोदवीरांच्या कलाकृतींनी नटलेल्या या गंमतीशीर संध्याकाळची मजा नक्की घ्या २५ आणि २६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता फक्त, सोनी मराठीवर.