Marathi News

‘हिरकणी’ महाराष्ट्रभर हाऊसफुल्ल!

Hirkani Marathi Movie
Hirkani Marathi Movie

यंदाची दिवाळी ऐतिहासिक आणि मराठमोळी पध्दतीने साजरी करण्यासाठी प्रसाद ओक यांनी माऊलीच्या धैर्याची गोष्ट सांगणारा ‘हिरकणी’ हा सुंदर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला. सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिरकणी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या अगोदरच प्रेक्षकांची चित्रपटाप्रती उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे कधी हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि बघायला जातोय अशी भावना अनेकांची होती. आणि तो दिवस २४ ऑक्टोबरला आला, ‘हिरकणी’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी इतकी गर्दी केली की चित्रपटाच्या तिकीटगृहावर हाऊसफुल्लची पाटी झळकली.

‘हिरकणी’ ज्या आठवड्यात प्रदर्शित झाला त्या आठवड्यात मराठी आणि हिंदी असे एकूण ५ चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनसाठी पाच चित्रपटांची मेजवाणी मिळाली. पण अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला प्राधान्य दिले. ‘हिरकणी’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आणि लगेच काही दिवसात, महाराष्ट्रभरात सोमवारी १५० आणि मंगळवारी सुध्दा १५० पेक्षा जास्त शोज् हाऊसफुल्ल झाले. इतकेच नव्हे तर एका दिवसात ७० पेक्षा जास्त शोज् वाढले आणि महाराष्ट्रात अनेक थिएटर्स देखील वाढले आहेत. माय बाप रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि ‘हिरकणी’ला मिळालेल्या या यशामुळे ख-या अर्थाने यावर्षीची दिवाळी मराठमोळ्या पध्दतीने साजरी झाली असे म्हणता येईल.

‘हिरकणी’ प्रेक्षकांपर्यंत सुखरुप पोहचली ते या चित्रपटाच्या निर्मात्यांमुळे. मॅगीज पिक्चर्स यांच्या सहकार्याने इरादा एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजेश मापुस्कर हे चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. लॉरेन्स डिसुझा हे सहनिर्माते आणि ‘इरादा एंटरटेनमेंट’च्या फाल्गुनी पटेल या निर्मात्या आहेत. सोनाली कुलकर्णी आणि अमित खेडेकर यांच्या ‘हिरकणी’ चित्रपटावर महाराष्ट्राचे प्रेम असेच राहू देत हीच प्रार्थना…

Related Articles

Leave a Reply

Back to top button