Marathi News

स्त्री – वादी भूमिकेसाठी ‘पोश्टर गर्ल’ सोनालीचा सन्मान

स्त्री भ्रूण हत्या आणि शेतकऱ्यांच्या व्यथांवर विनोदी अंगाने भाष्य करणारा ‘पोश्टर गर्ल’ नुकताच प्रदर्शित झाला. आपल्या चित्रपटातून स्त्री-भ्रूण हत्येचे दुष्परिणाम प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांचे, क्राइम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी अभिनंदन केले. तर ‘पोश्टर गर्ल’ चा चेहरा झालेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चा चित्रपटातल्या उत्तम कामगिरीसाठी जाधव यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

पोश्टर गर्ल सिनेमाला आपले समर्थन देणाऱ्या क्राइम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव पुण्यातल्या 5 महाविद्यालयांमध्ये स्वसंरक्षणाचे धडे देणार आहेत. या महाविद्यालयातल्या तरूणींना आपल्यातली पोश्टर गर्ल शोधण्यासाठी या प्रशिक्षणाचा फायदा नक्कीच होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या पोश्टर गर्ल या सिनेमात एका विचित्र गावाची कथा मांडण्यात आली आहे. जिथे गेल्या 15 वर्षांत एकही मुलगी जन्माला आलेली नाही. गावात मुलीचा जन्म न झाल्याने हे गाव बदनाम झाले आहे. अशा या गावात आज लग्नासाठी एकही मुलगी नाही. आणि अशातच होते एन्ट्री रूपाली थोरात ची…आणि सुरू होतो नवा खेळ…या खेळातून गावातल्या सगळ्या समस्यांवर ही वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायेंची पोश्टर गर्ल कसा तोडगा काढते…हे सिनेमागृहातच कळेल.

एका सामाजिक विषयावर व्यंगात्मक भाष्य करणारी ही कथा हेमंत ढोमे यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. गुरू ठाकूर, क्षितिज पटवर्धन, वैभव जोशी यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली असून अमितराज यांनी संगीत दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button