Marathi News
सोशल मिडीयावर लोकप्रिय होत आहे अन्वेषाचे ‘मन हे वेडे….’


मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारे ‘मन हे वेडे….’ हे रोमँटिक साँग काही महिन्यांपूर्वी सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. कवयित्री वैशाली मराठे यांनी लिहिलेल्या गीताला जीवन मराठे यांनी संगीत दिले असून प्रसिद्ध गायिका अन्वेषा हिने या गीताला स्वरसाज चढविला आहे. संगीत-संयोजन वरुण बिडये यांचे आहे तर तांत्रिक बाजु अनिल शिंदे यांनी सांभाळली आहे. या अल्बमची निर्मिती श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली आहे.
कुमार वयातच ‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. यापूर्वी अन्वेषाच्या आवाजातील ”बबन” चित्रपटातील मराठी गीतांना रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. ‘मन हे वेडे….’ या अल्बममधील गाणे देखील तिने अतिशय तरल आवाजात गायले असून हा अल्बम रसिकांमद्धे लोकप्रिय होताना दिसतो आहे.
हे गाणे ऐकण्यासाठी खूप सुंदर वाटत असले तरी, त्याची पडद्यामागील मेहनत खूप मोठी होती. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले श्रीनिवास कुलकर्णी यांचे निर्मिती हे लहानपणापासूनचे स्वप्न होते, लातूरसारख्या दुष्काळी भागातून येऊन हे सहकार्यांच्या साथीने हे स्वप्न साकार करता आल्याचा आनंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लवकरच या गाण्याचं फ्लूट वर्जन आणि व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे.
लवकरच या गाण्याचं फ्लूट वर्जन आणि व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे.