सुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’
चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे ह्यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम लवकरच 18 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे. सेवन सीज मोशन पिक्चर्स आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत समीर परब आणि संतोष परब निर्मित ओमकार माने आणि जयपाल वाधवानी दिग्दर्शित ‘बेखबर कशी तू’ हा तो म्युझिक अल्बम आहे.
गीतकार आशिष देशमुख आणि व्यान याने लिहिलेल्या ‘बेखबर कशी तू’ गीतला संगीतकार व्यान याने संगीतबध्द केले आहे. आणि हे गाणे गायले आहे, रॉकस्टार रोहित राऊतने. डेहराडून, हृषिकेश आणि सोनीपतच्या निसर्गरम्य ठिकाणी ह्या म्युझिक अल्बमचे चित्रीकरण झाले आहे.
ह्या अल्बमविषयी ‘व्हिडियो पॅलेस’चे नानुभाई जयसिंघानी म्हणाले, “ह्या म्युझिक अल्बमला प्रस्तुत करताना मला फार आनंद होत आहे. ह्याअगोदर कधीही अनुभूती न घेतलेली व्हिज्युअल ट्रिट, लोकेशन्स, कॉस्च्युम्स तुम्हांला ह्या अल्बममध्ये पाहायला मिळेल. आणि ती तुम्हांला आवडतील अशी मला खात्री आहे.”
‘सेवन सिझ मिडिया’चे निर्देशक आणि ‘बेखबर कशी तू’ गाण्याचे निर्माते समीर परब म्हणाले, “सेवन सिझ मीडियाव्दारे आम्ही 2015मध्ये ‘सासुचे स्वयंवर’ चित्रपट घेऊन आलो होतो. त्यानंतर आजच्या युवापिढीला आवडेल असे काही प्रोजेक्ट घेऊन येण्याचा मानस होता. त्यामुळेच रॉकस्टार रोहित राऊतसोबत युवापिढीचा हार्टथ्रोब सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडेला घेऊन ह्या ‘बेखबर कशी तू’ म्युझिक अल्बमची आम्ही निर्मिती केली. ह्या म्युझिक अल्बमला संगीतकार व्यान ह्याने खुप सुंदररित्या संगीतबध्द केलेले आहे. ”
म्युझिक अल्बमचा दिग्दर्शक ओंकार माने म्हणतो, “पटकन ओठांवर रूळतील असे शब्द, श्रवणीय संगीत. युथफुल चित्रीकरण आणि त्याला जोड आहे ती, सुमेध-संस्कृतीच्या रोमँसची. त्यामुळे हे गाणे रसिकांना नक्कीच आवडेल, अशी मला खात्री आहे. “