‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा ३१ डिसेंबरला

 

कोणत्याही रिऍलिटी शोचा पहिला दिवस आणि अंतिम फेरी हा प्रवास सर्वांसाठी वेगळाच असतो. पहिल्या दिवशी शो विषयी उत्सुकता असते तर अंतिम फेरीत कोण जिंकेल याविषयी कुतुहल असतं. आता संपूर्ण महाराष्ट्रात असंच कुतूहल निर्माण झालंय की कोण होणार ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’. १५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा ३१ डिसेंबरला रंगणार आहे. इतके महिने स्पर्धकांमध्ये तयार झालेली चुरस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आणि आता या स्पर्धेत ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चे टायटल कोण जिंकणार याकडेच सर्वांचे लक्ष.

‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर गेले कित्येक महिने प्रत्येक स्पर्धक हे एका पेक्षा एक सुपर परफॉर्मन्स देत आहेत आणि त्यांच्यामध्ये असलेले युनिक टॅलेंट आपण सर्व जाणतोच. आता अंतिम सोहळ्यात डान्स कॉम्पिटीशन ही अजून टफ होणार… वेगवेगळ्या पध्दतीचे डान्स-ऍक्ट होणार. अर्थात काय तर महाराष्ट्राला अंतिम सोहळ्यात अजून जास्त दमदार, जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार. स्पर्धकांच्या परफॉर्मन्सला दाद देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सुपर परफॉर्मन्सचे साक्षीदार होण्यासाठी सोनी मराठी वरील हलक्या-फुलक्या मालिकेतील कलाकार आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी या सोहळ्यात सुपर एनर्जीने आणि आनंदाने सामिल झाले.

पाहुणे कलाकारांनी स्पर्धकांसोबत केलेली धमाल, स्पर्धकांकडून घेतलेली त्यांच्या युनिक टॅलेंटची टीप, काही भावनिक क्षण आणि जजेसचे हटके आणि ग्लॅमरस परफॉर्न्स पाहण्यासाठी आणि अर्थात कोण ठरणार विनर हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले ३१ डिसेंबरला रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वर.

About justmarathi

Check Also

Zoljhal

“झोलझाल” चे जय वीरू

शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …

Leave a Reply