Marathi News

सिध्दार्थच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला मिळाला नवा चॉकलेट बॉय

Poshter girl1

 

‘एकुलती एक’या सिनेमातून सिल्व्हर स्क्रिनवर प्रवेश करणाऱ्या सिध्दार्थ मेनन ने कमी वेळातच तरूणींना आपल्या प्रेमाची भूल घातली आहे. ‘पोपट’, हॅप्पी जर्नी, स्लॅमबुक आणि राजवाडे अँड सन्स नंतर आपण सिध्दार्थला मल्टीस्टारर पोश्टर गर्लमधून पाहू शकणार आहोत. या सिनेमात सिध्दार्थ पोश्टर गर्ल सोनालीसोबत रोमान्स करताना आपल्याला दिसणार आहे.

 

अर्जुन कलाल ही व्यक्तीरेखा साकारणारा सिध्दार्थ गावात एकुलती एक असणाऱ्या पोश्टर गर्लच्या प्रेमात पडला आहे. तिच्यावर आपल्या प्रेमाची जादू करण्यासाठी सिध्दार्थने बरीच दिव्यं केली आहेत. एका बाजूला जितेंद्र जोशी तर दुसऱ्या बाजूला अनिकेत विश्वासराव अशा दोन जिगरबाज अभिनेत्यांबरोबर सिध्दार्थ ही पोश्टर गर्लच्या मागावर आहे.

 

सिध्दार्थचा सोनालीसोबतचा रोमान्स पाहून मराठी सिनेसृष्टीला नवा चॉकलेट बॉय मिळाला हे म्हणायला हरकत नाही.

 

बियर शॉपी चालवणारा हा उस्ताद पोश्टर गर्लला आपल्या प्रेमात पाडतो की नाही यासाठी 12 फेब्रुवारीला पोश्टर गर्लचे स्वयंवर चुकवू नका.

Related Articles

Leave a Reply

Back to top button